चिकन, अंड्यासह अजूनही बरंच काही... वाझेच्या तुरुंगातील मागण्या वाचल्या का?

घरच्या जेवणाची आणि फिजिओथेरपीची परवानगी त्याने मागितल्याचे समोर येतं आहे. वाझेवर (Sachin Waze) ऑक्टोबरमध्ये ओपन हार्ट सर्जरी (Heart surgery) करण्यात आली
चिकन, अंड्यासह अजूनही बरंच काही... वाझेच्या तुरुंगातील मागण्या वाचल्या का?
चिकन, अंड्यासह अजूनही बरंच काही... वाझेच्या तुरुंगातील मागण्या वाचल्या का?Saam Tv
Published On

मुंबई : सचिन वाझेने परत एकदा न्यायालयात धाव घेत आजारपणाचे कारण पुढे केले आहे. घरच्या जेवणाची आणि फिजिओथेरपीची परवानगी त्याने मागितल्याचे समोर येतं आहे. वाझेवर (Sachin Waze) ऑक्टोबरमध्ये ओपन हार्ट सर्जरी (Heart surgery) करण्यात आली होती. त्यामुळे सचिन वाझेचे वजन ५ किलोने कमी झाले आहे.

उपचारानंतर डॉक्टरांनी वाझेला नियमित फिजिओथेरपी आणि उच्च प्रोटीनयुक्त आहार (aliment) घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, जेलमधील (prison) कैद्यांना त्याची परवानगी नाही. तसेच याकरिता कोर्टाची विशेष परवानगीही घेणे गरजेचे आहे. वाझेला मागील सुनावणीस घरच्या जेवणाला परवानगी जरी दिली असली, तरी कारागृहामध्ये त्यांना घरातून पाठवलेली अंडी आणि मांसाहार खाण्यास मनाई आहे. त्यामुळे वाझेने कोर्टाकडे नव्याने काही मागण्या केले आहेत.

हे देखील पहा-

सध्या कारागृहामध्ये दाढी करण्याकरिता एकच वस्तरा वापरला जात असल्याचे सांगत यापासून क्षयरोग (Tuberculosis) होण्याची भीती आहे, असे वाझेने यावेळी सांगितले आहे. त्यामुळे खासगी ट्रिमर वापरण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी वाझेने संबंधित याचिकेमध्ये केली आहे. ८ डिसेंबर रोजी चांदिवाल आयोगात (Chandiwal Commission) चौकशीकरिता नेले जात असताना वाझेला छातीत तीव्र वेदना झाले होते. त्याना चक्कर येत होती.

चिकन, अंड्यासह अजूनही बरंच काही... वाझेच्या तुरुंगातील मागण्या वाचल्या का?
Instagram Reels बनवणं पडलं महागात! गळफास लागून 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

परंतु, त्यांना रुग्णालयात (hospital) नेण्याऐवजी परत तुरुंगात आणण्यात आले होते. यानंतर याचिकेमध्ये खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी मिळावी, अशी मागणी सचिन वाझेनी यावेळी केली आहे. ज्या रुग्णालयामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली तिथे उपचाराची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. पुढील आठवड्यात याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com