Instagram Reels बनवणं पडलं महागात! गळफास लागून 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

व्हिडीओ शूट करणे एका तरुणाच्या चांगलंच जीवावर बेतल्याचे समोर आले
Instagram Reels बनवणं पडलं महागात! गळफास लागून 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
Instagram Reels बनवणं पडलं महागात! गळफास लागून 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यूSaam Tv
Published On

वृत्तसंस्था : सध्या मुलामुलींन मध्ये इंस्टाग्राम रिल व्हिडीओ (Reels video) शूट करण्याचे फ्याड असल्याचे बघायला मिळत आहे. अशाच प्रकारे व्हिडीओ शूट करणे एका तरुणाच्या चांगलंच जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. इंस्टाग्रामवर (Instagram) व्हिडीओ तयार करत असताना दुर्घटना होऊन एका १०वीच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एका गाण्यावर व्हिडीओ (Video) शूट करत असताना त्याला अचानक गळफास लागला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

मध्यप्रदेश (Madhya Pradesh) मधील इंदूर (Indore) शहरामधील ही धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता १०वीत शिकणारा विद्यार्थी इंस्टाग्रामवर रिल्स तयार करत होता. याकरिता त्याने एक फास तयार केला होता आणि आपल्या मित्राबरोबर मोबाइलवर व्हिडीओ शूट करत होता. हा व्हिडीओ शूट करत असताना अचानक त्याचा खुर्चीवरुन पाय सटकला आणि व्हिडीओ शूट करण्याकरिता तयार करण्यात आलेला फास त्याच्या गळ्यात अडकला.

हे देखील पहा-

यामध्ये त्याचा मृत्यू (Death) झाला आहे. यावेळी त्याचा लहान भाऊ घरी परतला तेव्हा ही घटना उघडकीस आली आहे. इंदूर शहरातील हिरा नगर परिसरात ही धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील १०वीत शिकणारा विद्यार्थी आपल्या मित्राबरोबर (friend) इंस्टाग्रामवर रिल्स तयार करत होता. मृतक हा अल्पवयीन आहे. तो व्हिडीओ करत होता आणि त्याचा मित्र शूट करत होता. याकरिता त्यांनी गाणे लावले आणि शूटिंगकरिता एक फास तयार करुन, खुर्चीवर उभा राहून गळफास घेण्याची अॅक्टिंग करत होता.

Instagram Reels बनवणं पडलं महागात! गळफास लागून 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
बीडमध्ये बंद पडलेल्या अतिथी बारवर छापा; 92 हजारांचा मुद्देमाल जप्त

याचवेळेस तोल गेला आणि तो खाली कोसळला. यावेळी त्याच्या गळ्यात फास अडकला आणि त्याला गळफास लागला आहे. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मृतक विद्यार्थ्याचे आई आणि वडील हे एका लग्नसोहळ्याकरिता बाहेर गेले होते. मृतक मुलगा घरी एकटा होता. त्यावेळी त्याने आपल्या घरी इतर मुलांना बोलावून इंस्टाग्राम रिल्स शूट करण्याचे ठरवले. या दरम्यानच ही दुर्घटना घडली आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

गळफास लागल्यामुळे त्याचे मित्र घाबरले आणि त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. ज्यावेळी मृतक विद्यार्थ्याचा लहान भाऊ घरी परतला तेव्हा ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी (police) घटनास्थळावरुन त्याचा मोबाइल जप्त केला असून अधिक तपास पोलीस करत आहे. मृतक मुलाचे आई वडील जावरा या गावी लग्नाकरिता गेले होते. त्यांनी सांगितले की, लग्नाकरिता (marriage) ते जावरा येथे गेले होते. त्यावेळी मुलाने त्यांना कॉल करुन विचारले होते की तुम्ही लग्नाहून घरी कधी परतणार आहात. त्यावर आम्ही १-२ दिवसांत परत येऊ असे सांगितले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com