Navneet Rana
Navneet Rana Saam TV
मुंबई/पुणे

नवनीत राणांना जेलमध्ये हीन दर्जाची वागणूक; वॉशरूमला जाण्याची परवानगी नाकारल्याचा आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नवनीत राणा प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavsi) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. शनिवारी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. दरम्यान राणा यांना पोलिसांनी दोन समाजात तेढ निर्माण केल्याचे वर्तन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली. तसंच त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला या सर्व पार्श्वभूमिवर फडणवीस यांनी आज पत्रकार परिषेत सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana and Ravi Rana) यांच्याबाबत जो व्यवहार करण्यात आला आहे तो अत्यंत गंभीर आहे. त्यांनी काय सांगितलं होतं, 'आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचू आंदोलन, हल्ला असं काहीही म्हटलं होतं का? परंतु हनुमान चालीसा म्हणण्याला इतका विरोध का हनुमान चालीसा काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची का ? असे सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले.

हनुमान चालीसा म्हंटल्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असाल तर आमच्यापैकी प्रत्येकजण राजद्रोह करण्याकरता तयार आहे, असही फडणवीस म्हणाले. ज्या प्रकारे हे सरकार वागतंय हे लज्जा आणणारं आहे. यापेक्षाही नवनीत राणा यांना जेलमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली, पिण्याचे पाणी दिलं नाही, वॉशरूमला जाण्याची परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली असून त्यांनी यासंदर्भात वकिलांच्या माध्यमातून देशाचे संसदेचे सभापतींकडे तक्रार केली आहे असही फडणवीसांनी सांगितलं.

हे देखील पाहा -

तसंच ज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) पोलीसांच्या समोर हल्ला झाला. मोहित कंबोज यांच्या मॉब लिंचिंगचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी चालू आहेत. भाजपच्या लोकांना टार्गेट करून त्यांच्यावर बागस केसेस नोंदवल्या जातात. कधी प्रवीण दरेकरांवर (Pravin Darekar) बोगस केस होते. हायकोर्टावर आरोप केला जातो. इतक्या खालच्या थराला नेतेमंडळी पोहोचली आहेत असही ते म्हणाले.

निंबाळकर, गोरे यांच्यावर खोट्या केस केल्या. पोलिसांचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत आहे. कारण एकही केस टीकली नाही. धादांत खोट्या केस टाकल्या जातात. गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा काय? गृहमंत्र्यांना काही अधिकार आहेत का? सर्व काही मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर चालू आहे. मुख्यमंत्रीच नाहीत, तर आम्हाला बोलावून काय फायदा आहे. काही बैठक म्हणजे टाइमपास आहे का, असा आमचा सवाल आहे. सत्तारूढ पक्षाची अहंकारी भूमिका आहे. एका महिलेकरिता हजोरो लोक गोळा करता. त्यांच्या घरी जाऊन अटक करता जणू काही पाकिस्तानशी युद्ध जिंकल्यासारखं जल्लोष काय करता तसंच मुख्यंमंत्री कुठल्या आजीकडे गेले, जणू काही त्या युद्ध जिंकल्या आहेत असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्याच्या कालच्या भेटीवर टीका केली. दरम्यान एसटी संपकरी, संपात आत्महत्या करणाऱ्या कुटुंबीयांच्या घरी, शेतकऱ्यांच्या घरी गेला असता तर समजलं असतं. असही ते म्हणाले.

सरकार कीती द्वेष करत आहे की, एका महिला खासदाराला नामोहरम करण्याकरिता पहिल्या दिवशी रिमांडमध्ये वेगळं सेक्शन, दुसऱ्या दिवशी राजद्रोहाचं सेक्शन, हनुमान चालीसा म्हंटल्यामुळं राज्य सरकार उलथवलं जाईल असा कट होतो म्हणणे यापेक्षा हास्यास्पद काय आहे असही फडणवीस म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

SCROLL FOR NEXT