Marathwada University : ५५ महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित; शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने मराठवाडा विद्यापीठाचा निर्णय

Sambhajinagar News : सुरुवातीच्या तपासणीत १०० पेक्षा अधिक महाविद्यालयांचे प्रवेश थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली. मात्र, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत महाविद्यालयांना मुदतवाढ देण्यात आली होती
Marathwada University
Marathwada UniversitySaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयांमध्ये झालेल्या तपासणीत शिक्षणासाठी पुरेशा सुविधा नाही. तसेच प्राध्यापक संख्या नसल्याने छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ५५ पेक्षा अधिक महाविद्यालयांतील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित करण्यात आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यातील पदव्युत्तर महाविद्यालयांची मागील महिन्यात तपासणी करण्यात आली होती. या तपासणीनंतर ज्या महाविद्यालयात प्राध्यापक नाहीत आणि शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळून आले. अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ नये; अशी यादीच विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. तर उर्वरित काही महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबविले आहेत. 

Marathwada University
Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

यापूर्वी देण्यात आली होती मुदतवाढ 

मराठवाडा विद्यापीठाने संलग्न असलेल्या पदव्युत्तरच्या १८९ महाविद्यालयांतील पायाभूत सुविधांसह उपलब्ध प्राध्यापकांची तपासणी केली होती. त्यात सुरुवातीच्या तपासणीत १०० पेक्षा अधिक महाविद्यालयांचे प्रवेश थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत संबंधित महाविद्यालयांना भौतिक सुविधांसह प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी मुदतवाढ देण्यात आली. 

Marathwada University
Dombivali Crime : पुण्यात दुचाकी चोरी करून डोंबिवलीत चैन स्नॅचिंग; तीन सराईत चोरटे ताब्यात

अखेर प्रवेश पूर्णपणे स्थगित 

दरम्यान ५५ पेक्षा अधिक पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांचे प्रवेश स्थगित करण्यात आले. या स्थगित केलेल्या काही महाविद्यालयांमध्ये संस्था चालक विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत. त्यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक विभागाने प्राचार्यांना पत्र पाठवून संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच स्थगिती दिलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यास नुकसानीची जबाबदारी महाविद्यालयांवर असेल, असेही स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com