Zilha Parishad School : झेडपीच्या शाळेचा चेहरामोहरा बदलला, दौंडमधील मेमानवाडीच्या शाळेची जोरदार चर्चा, मुलं जर्मन बोलतात... वाचा

Baramati News : शेलार मेमानवाडीतील जिल्हा परिषदेची शाळा उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचे एक उदाहरण बनली आहे. २०१९ साली शाळेची भिंत मोडकळीला आली होती. विद्यार्थ्यांना खेळायला ग्राउंड देखील नव्हतं.
Zilha Parishad School
Zilha Parishad SchoolSaam tv
Published On

बारामती : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असणाऱ्या मेमानवाडी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेने आपल्या वेगळ्या शिक्षण पद्धतीने मोडकळीस आलेल्या शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून मेमानवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत आपल्या मुलांना टाकलंय. यामुळे बंद पडणारी शाळा पुन्हा एकदा चांगल्या स्थितीत चालू झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील शेलार मेमानवाडीतील जिल्हा परिषदेची शाळा उत्कृष्ट शिक्षण पद्धतीचे एक उदाहरण बनली आहे. २०१९ साली शाळेची भिंत मोडकळीला आली होती. विद्यार्थ्यांना खेळायला ग्राउंड देखील नव्हतं. परिणामी पटसंख्या कमी होऊन दहावर पोहचली होती. पण याच काळात मुख्याध्यापक अमर खेडेकर आणि त्यांच्या पत्नी धनश्री पासलकर हे शिक्षक दांपत्य गावात आलं आणि या दोघांनी जिल्हा परिषद शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला.

Zilha Parishad School
Maval : ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; ग्रामपंचायत प्रशासनाला कंटाळून नागरिक संतप्त

जिल्हा परिषद शाळा ठरतेय राज्यात वेगळे उदाहरण 
एकीकडे सरकारी शाळांचे अवस्था पाहिली तर घटत चाललेली पटसंख्या, मोडकळीला आलेल्या वर्गखोल्या हे चित्र महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पण शेलार मेमाणवाडीची जिल्हा परिषद शाळा सगळ्याला अपवाद ठरली आहे. इथले विद्यार्थी फडफड जर्मन भाषा बोलतात आणि कोडींगही करतात. गेम खेळण्याच्या वयात स्वतः गेम तयार करून खेळतात. शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. कोडिंग, रोबोटिक्स, वेबसाईट डेव्हलपमेंट, जर्मन भाषा, ओलंपिक गेम, टेलिस्कोपवर आकाश निरीक्षण असे अनेक उपक्रम राबवले गेल्याने विद्यार्थ्यांना देखील शाळेत यायला आवडते. 

Zilha Parishad School
Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

इंग्रजी माध्यमातून काढून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश 
सुरुवातीला विद्यार्थी मिळत नसल्याने पालकांना देखील शाळा बंद होते का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हे शिक्षक दाम्पत्य आल्यानंतर शाळेचे चित्रच बदलून गेले आहे. त्यामुळे पालकांनी देखील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन काढून या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला. याच पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवले तर राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचवणार आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढी बरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळेची गोडी निर्माण होणार आहे. 

शिक्षक दाम्पत्याची बदली रद्दची मागणी 
दरम्यान शाळेचा ज्या शिक्षकांनी चेहरा मोहरा बदलला, त्याच शिक्षकांची आता बदली झाली असल्याने येथील ग्रामस्थ आता चिंतेत आहेत. खेडेकर दांपत्याने शाळेमध्ये जी ऍक्टिव्हिटी राबवली आहे; ती दुसरी शिक्षक येऊन करू शकणार नाहीत. त्यामुळे खेडेकर दांपत्याची बदली प्रशासनाने रद्द करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com