Murli Naik Mother Crying  Saam Tv News
मुंबई/पुणे

Murli Naik : मुरली नाईक अमर रहे! पाकड्यांशी लढताना लेकराला वीरमरण, मजूर बापाचा अन् जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो

Murli Naik Mother Crying : उरी सेक्टरमध्ये मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक हे पाकिस्तान्यांशी लढताना शहीद झाले आहेत. त्यांच्या वीरमरणाची बातमी गावी समजताच कुटुंबीयांनी टाहो फोडला.

Prashant Patil

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाचे सायरन वाजले असून एअर स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांनी सीमारेषेवर घणाघात सुरू असल्याचं दिसून येतं. भारतीय वायू दलानं पाकिस्तानी सैन्याचे दोन विमाने पाडले असून त्यांच्या कारवायांना हवेतच नेस्तनाबूत केलंय. दुसरीकडे सीमारेषेवर तणावाचं वातावरण असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. मात्र, उरी सेक्टरमध्ये मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक हे पाकिस्तान्यांशी लढताना शहीद झाले आहेत. त्यांच्या वीरमरणाची बातमी गावी समजताच कुटुंबीयांनी टाहो फोडला. आपला तरणाबांड लेक गमावल्यानंतर आईच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. मुरली नाईक शहीद झाल्याचं समजताच त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. तर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने भारतात हल्ले करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उरीमध्ये कर्तव्यावर असलेले जवान एम. मुरली नाईक हे शहीद झाले आहेत. देशासाठी बलिदान देणाऱ्या एम. मुरली नाईक यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील असून सध्या ते त्यांच्या मूळ गावी आंध्र प्रदेशमधील कल्की तांडा या ठिकाणी यात्रा असल्याने २ मे २०२५ रोजी गेलेले आहेत. त्यामुळे, शहीद जवान यांचे प्रेत अंत्यविधिकारिता त्यांच्या मूळ गावी उद्या १० मे रोजी सायंकाळी जाणार आहे, असं पंजाब येथील थलसेना कार्यालयातून त्यांना कळविण्यात आल्याची माहिती ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT