Varsha Gaikwad Saam Tv
मुंबई/पुणे

Varsha Gaikwad : संविधान संपवलं जातंय, संविधानाला घराघरात पोहचविणे गरजेचे : वर्षा गायकवाड

Samvidhan Din : देशाच्या संसदेत संविधानाची मायमल्ली केली जातेय. आताचं राजकारण हे जाती-पातीचं होत चाललं आहे. येणाऱ्या काळात ही लढाई देशाची व जनतेची असेल, असं मुंबई काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Varsha Gaikwad News :

देशाच्या संविधानाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे. देशाचं संविधान जुनं झालं आहे, ते बदललं पाहिजे, अशी भूमिका सरकार घेत आहे. या सगळ्यांना उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला घराघरात संविधान पोहोचविणे गरजेचे आहे. तसेच देशाच्या संसदेतही संविधानाची मायमल्ली केली जातेय. आताचं राजकारण हे जाती-पातीचं होत चाललं आहे. येणाऱ्या काळात ही लढाई देशाची व जनतेची असेल, असं मुंबई काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसुचित जाती विभाग व मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनी येथील राजगृहाजवळील राजा शिवाजी विद्यालयातील बी. एम. वैद्य सभागृहात संविधान दिवस कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी त्या असं म्हणाल्या आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षा गायकडवाड म्हणाल्या की, सध्या देशात हुकुमशाही आहे. दोन वर्ष झाली एकाही योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी किंवा आढावा घेतलेला नाही. मुलांना शिष्यवृत्ती दिली जात नाही. सरकारी शाळा बंद केल्या जात आहे. जनतेला सरकारने काहीही दिलेले नाही, त्यामुळे आता रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी आंदोलने व मोर्चे काढावे लागतील. संविधान घराघरात पोहवून क्रांती घडवावी लागेल. लोकशाहीमध्ये लढाई ही खूप गरजेची आहे. ती लोकशाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. आज आपण बाबासाहेबांच्यामुळे इथे आहोत, असेही त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

संविधान वाचविण्यासाठी सगळ्यांना एकजुटीनं लढावं लागणार आहे. ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातंय. देशाची १४० कोटी लोकसंख्या आहे. यावरून देशाची गरिबी किती वाढत आहे, हे लक्षात येते. मोदी सरकार जनतेला गरीबीच्या वाटेवर नेत आहे. मोदी सरकारने जीएसटी आणून गरीबांच्या खिशातले पैसे काढले आणि मोदींनी ते पैसे उद्योगपती मित्रांच्या तिजोरीत टाकले. आता गरीबांच्या मुलांना शिक्षण घेणे कठीण झालं आहे. संविधान जनजागृतीच्या माध्यमातून सर्वांमध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रासह देशभरात वाटचाल सुरू झाली आहे, असे महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

संविधानाची रक्षा करणे आणि संविधान टिकवणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. संविधानातील पान फाडण्याचे काम आरएसएसची लोक करत आहेत. मोदी सरकारने मीडियाला आपल्या मुठीत ठेवले आहे. आपली देशाच्या संविधानाला वाचविण्याची जबाबदारी आहे. संविधान संपलं तर आपलं जगणं कठीण होऊन जाईल, अशी माहिती ऑल इंडिया काँग्रेस एससी विभागाचे अध्यक्ष डॉ. राजेश लिलोठिया यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

Zp School : शाळेत सुविधांची वानवा; विद्यार्थिनीचे सरपंच- ग्रामसेवकाला पत्र, व्यथा मांडत सुधारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT