Indapur well accident A case has been registered against well owner and contractor Saam TV
मुंबई/पुणे

Indapur Accident: इंदापूर विहीर दुर्घटना प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; विहीर मालकासह ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Indapur well Accident Case: इंदापूर विहीर दुर्घटनेप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. भिंगवण पोलिसांनी विहीर मालक गिरीष विजय क्षीरसागर आणि ठेकेदार विश्वास गायकवाड या दोन जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मंगेश कचरे

Indapur well Accident Case: इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीचं काम सुरू असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत चार कामगारांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. तब्बल ६६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर चारही मजूरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. भिंगवण पोलिसांनी विहीर मालक गिरीष विजय क्षीरसागर आणि ठेकेदार विश्वास गायकवाड या दोन जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी विहीर मालक विजय क्षीरसागर याला अटक देखील केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी याबाबतची माहिती दिली.

घटना नेमकी काय?

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे एका दगडी खाणीला विहिरीत रुपांतरित करण्याचे काम सुरू होते. यावेळी विहिरीत चार मजूर काम करत होते. दरम्यान, विहिरीचा कठडा बांधताना रिंग व माती ढासळल्याने चारही मजूर मातीखाली गाडले गेले. ही दुर्घटना १ ऑगस्ट रोजी घडली होती.

पण, त्याचा उलगडा रात्री उशिरा झाला, त्यानंतर शोध आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. तब्बल ६६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर एनडीआरएफने चौघांचे मृतदेह बाहेर काढले. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२ वर्षे), जावेद अकबर मुलाणी (वय३० वर्षे), परशुराम बन्सीलाल चव्हाण (वय ३० वर्षे), मनोज मारूती चव्हाण (वय ४० वर्षे) अशी मृत कामगारांची नावे आहेत.

दरम्यान, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या नातेवाईकांनी विहिरीचे कामे बेकायदेशीर असून या मालकाने ४ कुटुंबांचा जीव धोक्यात घातला, अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी विहीर मालक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, या घटनेची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत मजुरांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे. याबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना कामगारांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी केली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT