IAS Officer Transfer: राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे झाली बदली? वाचा...

Maharashtra IAS Officer Transfer: राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील प्रमुख सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Maharashtra IAS Officer Transfer List In Marathi
Maharashtra IAS Officer Transfer List In Marathi Saam TV
Published On

Maharashtra IAS Officer Transfer List: राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवर भाकरी फिरवली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील प्रमुख सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी देण्यात आले आहेत.

यात आयएएस अधिकारी सोनिया सेठी यांचा सुद्धा समावेश आहे. सोनिया यांची महसूल आणि वनविभाग मंत्रालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झाली. तर रुपिंदर सिंग यांची निवासी आयुक्त प्रधान सचिव महाराष्ट्र सदन नवीन दिल्ली या ठिकाणी बदली झाली आहे.

Maharashtra IAS Officer Transfer List In Marathi
Maharashtra Politics: शरद पवारांना आणखी एक धक्का? राष्ट्रवादीतील बडा नेता अजितदादांच्या संपर्कात; सूत्रांची माहिती

राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सोनिया सेठी, IAS (1994) यांची प्रधान सचिव (R&R), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रुपिंदर सिंग, IAS (1996) यांची निवासी आयुक्त आणि प्रधान सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गोरक्ष गाडीलकर, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, वर्धा यांची संचालक, रेशीम, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकाश बी.खपले, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, नांदेड यांची महाडीस्कॉम, औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अविनाश पाठक, IAS (2013) अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गुलाब आर.खरात, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, जळगाव यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रविणकुमार देवरे, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे यांची संचालक, OBC बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मिलिंदकुमार डब्लू.साळवे, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, गडचिरोली यांची सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सतीशकुमार डी. खडके, IAS (2014) मुख्य भूमापन अधिकारी, सिडको, नवी मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक मेट्रो क्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संजय एस. काटकर, IAS (2014) उपायुक्त (महसूल), नाशिक विभाग, नाशिक यांची सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra IAS Officer Transfer List In Marathi
Mumbai News: लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीवर चाकूने सपासप वार; संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

पराग एस. सोमण, IAS (2014) उपायुक्त (महसूल), औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अनिलकुमार के. पवार, IAS (2014) महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, विरार यांना IAS मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे आणि त्यांना महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, विरार या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

सचिन बी. कालत्रे, IAS (2014) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांना IAS मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे आणि त्यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मनोज व्ही. रानडे, IAS (2014) उपायुक्त (सामान्य प्रशासन), कोकण विभाग, मुंबई यांची संचालक, महापालिका प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नेहा भोसले (2020) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, किनवट, नांदेड यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, जव्हार, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुरुगनंथम एम. (२०२०) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, चंद्रपूर यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रिचर्ड यंथन (2020) सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती उपविभाग, अमरावती यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, धारणी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्तिकेयन एस. (2020) सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद उपविभाग, यवतमाळ यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, किनवट, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com