Maharashtra Politics: शरद पवारांना आणखी एक धक्का? राष्ट्रवादीतील बडा नेता अजितदादांच्या संपर्कात; सूत्रांची माहिती

Sharad Pawar vs Ajit Pawar: शरद पवार यांच्या गटातील एक बडा नेता अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Maharashtra Politics Another mla from Sharad Pawar group will join Ajit Pawar group source information
Maharashtra Politics Another mla from Sharad Pawar group will join Ajit Pawar group source informationSAAM TV
Published On

Sharad Pawar vs Ajit Pawar: अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत अभूतपूर्व फूट पडली. अनेक आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना समर्थन दिलं. तर काही आमदार आणि पदाधिकारी अजूनही शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. दरम्यान, अशातच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय.

शरद पवार यांच्या गटातील एक बडा नेता अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे हा नेता शरद पवार यांचा अतिशय विश्वासू आणि जवळचा असल्याची माहिती आहे.

Maharashtra Politics Another mla from Sharad Pawar group will join Ajit Pawar group source information
Mumbai-Pune Travel: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून जाता येणार सुसाट; एमएसआरडीसीने घेतला मोठा निर्णय

राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेत असताना या नेत्याने अतिशय महत्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळली असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शरद पवार यांच्या गटातील अतिशय महत्वाचा नेता अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येताच राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सूटल चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांनी युती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांच्या गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

Maharashtra Politics Another mla from Sharad Pawar group will join Ajit Pawar group source information
Mumbai Megablock: मुंबईकरांनो, विकेंडला घराबाहेर पडताय? आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

राज्यभरातील अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना समर्थन देत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी आपण पुन्हा नव्याने पक्षबांधणी करू, असं सांगितलं आहे.

अजित पवार यांनी बोलावली तातडीने बैठक

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज आपल्या गटातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये ही बैठक होणार आहे. दुपारी १ वाजता या बैठकीला सुरूवात होणार असून या बैठकीत नव्याने पक्षबांधणी करण्यासोबतच अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंधरा तारखेनंतर सुरू होणारा शरद पवारांचा दौरा, जर पक्ष चिन्ह गेलं तर ते कोणतं असावं, प्रतिज्ञापत्र भरण्याची सद्यपरिस्थिती या विषयावर बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com