Mumbai Megablock: मुंबईकरांनो, विकेंडला घराबाहेर पडताय? आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block Sunday 7 August 2023: रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकल विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक जाणून घेणे गरजेचे आहे.
mumbai local train mega block Sunday 7 August 2023 on central harbor western railway lines
mumbai local train mega block Sunday 7 August 2023 on central harbor western railway lines Saam tv
Published On

Mumbai Local Mega Block Sunday 7 August 2023: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. आज म्हणजेच रविवारी (७ ऑगस्ट) लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेप्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे लोकल विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक जाणून घेणे गरजेचे आहे.

mumbai local train mega block Sunday 7 August 2023 on central harbor western railway lines
Mumbai-Pune Travel: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरून जाता येणार सुसाट; एमएसआरडीसीने घेतला मोठा निर्णय

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप -डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ८.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान CSMT येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाणे स्थानकानंतर पुन्हा धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.

त्याचबरोबर कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकात थांबतील, पुढे माटुंगा स्थानकावर धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. अप- डाऊन दिशेचा दोन्ही लोकल सेवा आपल्या नियोजित स्थळी १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.

mumbai local train mega block Sunday 7 August 2023 on central harbor western railway lines
Maharashtra Gujarat Border: महाराष्ट्रातील गावांवर गुजरातचा दावा; दीड किमी घुसखोरी केल्याचा स्थानिकांचा आरोप

प्रवाशांच्या सोईसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करू शकता.

पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील मरिन लाइन्स -माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कालावधीत मरिन लाइन्स आणि माहीम रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील.

प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे लोकल सेवा महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर थांबणार नाहीत. लोअर परळ आणि माहीम जंक्शन येथे डाऊन दिशेच्या सर्व स्लो सेवा बंद केल्या जातील. याशिवाय ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द रहाणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com