परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, आणखी एक गुन्हा दाखल Saam TV
मुंबई/पुणे

परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, आणखी एक गुन्हा दाखल

वसूली प्रकरणी गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंह यांच्यावर गोरेगाव पोलीस Goregaon Police ठाण्यात आणखी एक वसूली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंह यांच्यासोबत सचिन वाजे Sachin Vaze , सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांची नावे देखील या गुन्ह्यात समोर आली आहेत.

हे देखील पहा -

दरम्यान, हा गुन्हा बिमल अग्रवाल या व्यापार्याने नोंदवला आहे. या व्यापार्याने आपल्या तक्रारीत जानेवारी-फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२१ मध्ये आरोपींनी त्यांच्याकडून तब्ब्ल ९ लाख रुपय वसूल केले होते अशी माहिती समोर आली आहे.

गोरेगाव मध्ये BOHO रेस्टोरेंट बार अ‍ॅन्ड अंधेरी ओशिवारा मध्ये BCB रेस्टोरेंट अ‍ॅन्ड बार चालवण्यासाठी सचिन वाजे आणि इतर आरोपींनी ९ लाख रुपये, सँमसंग कंपीचे मोबाइल हप्ता म्हणून घेतले असेअग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी IPC कलम ३८४, ३८५ आणि ३४ भा.द.वी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT