Income Tax department Raid: यशवंत जाधव यांच्या घरी सलग चौथ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरुच Saam Tv
मुंबई/पुणे

Income Tax department Raid: यशवंत जाधव यांच्या घरी सलग चौथ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरुच

शिवसेनेचे मुंबई महापालिकेमधील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याची सध्या कारवाई सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे मुंबई (Mumbai) महापालिकेमधील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याची (Income tax department) सध्या कारवाई सुरु आहे. मागील ४ दिवसापासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू आहे. या दरम्यान, या ४ दिवसांच्या चौकशीमध्ये अधिकाऱ्यांच्या नेमके हाती काय लागले ते आजून देखील गुलदस्त्यामध्येच आहे. या छापेमारीत या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांच्या घराबाहेर पोलिसंचा (police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Income tax department raids Yashwant Jadhav house fourth day row)

हे देखील पहा-

या दरम्यान, यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट (Tweet) देखील केले आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळ्याविषयी १८ ऑगस्ट २०२१ दिवशी आयकर विभाग आणि ईडी (ED) कडे तक्रार दाखल करण्यात आली होती, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. यानंतर आज सलग चौथ्या दिवशी देखील आयकर अधिकाऱ्यांचा मुक्काम तिथेच आहे.

मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या माझगाव मधील घरी ही कारवाई सुरू आहे. याशिवाय त्यांच्या निकटवर्तीयाच्या घरी देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापा टाकून कारवाई केली आहे. जानेवारी महिन्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईत कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता.

तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा देखील गंभीर आरोप सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढेच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे संपूर्ण पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे देखील किरीट सोमय्या यांनी म्हणले होते. यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप झाल्याचे बघायला मिळाले होते.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर असतानाच शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागाने छापा घातला आहे. यामुळे या छापेमारीमध्ये यशवंत जाधव यांच्या घरातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय लागते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सरन्यायाधीश भूषण गवईंविरुद्ध आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Police Constable Bharti: धक्कादायक! ७,५०० कॉन्स्टेबल पदासाठी १०,००,००० अर्ज; पीएचडी, इंजिनियर अन् पदवीधारकांकडून प्रयत्न

सांगलीत अजित पवारांचा नेता मोठा निर्णय घेणार, पक्षविरहित स्थानिक निवडणूक लढवणार

Dharashiv : गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेले; परराज्यातील दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता आरक्षण सोडतीची तारीख ठरली, कधी आणि कुठे होणार कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT