Corona: तिसरी लाट आटोक्यात; काळजी करण्याचा विषय नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख खाली येताना दिसून येत आहे.
Corona: तिसरी लाट आटोक्यात; काळजी करण्याचा विषय नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Corona: तिसरी लाट आटोक्यात; काळजी करण्याचा विषय नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपेSaam Tv News
Published On

जालना: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Corona) रुग्णांचा आलेख खाली येताना दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे चित्र आहे. मुंबई (Mumbai), पुणे, नागपूर (Nagpur) बरोबरच महत्वाच्या शहरात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. यामुळे तिसरी लाट आटोक्यामध्ये आल्याची परिस्थिती झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी देखील राज्यात तिसरी लाट आटोक्यात आल्याचे सांगितले आहे. जालना येथील एका कार्यक्रमात राजेश टोपे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, तिसरी लाट आटोक्यात आली आहे. काळजी करु नका. जालन्यामध्ये (Jalna) रविवारी पल्स पोलिओचे (Pulse Polio) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. (Corona The third wave was contained Rajesh Tope)

हे देखील पहा-

यावेळी राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी टोपे म्हणाले की, ‘राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. काळजी करण्याचा विषय नाही. राज्यामध्ये सध्या १० टक्के पण रुग्ण राहिले नाहीत. मास्क मुक्तीचा निर्णय विचार करून घेणार असल्याचे यावेळी राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले आहे. तिसरी लाट आटोक्यात आली असल्याची दिलासा देणारी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना याठिकाणी दिली आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने आज राज्यामध्ये १० टक्के पण रुग्ण नाही. यामुळे तिसरी लाट आटोक्यामध्ये आणण्यात राज्य सरकारला यश आले आहे.

Corona: तिसरी लाट आटोक्यात; काळजी करण्याचा विषय नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Nagpur Crime: WhatsApp स्टेटस ठेवण्यावरुन राडा; लग्नाच्या वरातीत गोळीबार

मात्र कोरोना पूर्ण पणे हद्द पार झाला आहे, अशा भ्रमात न राहता मास्क (Mask) मुक्तीचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा लागणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. मागील २ महिन्यांपेक्षा आता राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट होत आहे. पॉझिटिव्हिटी मध्ये देखील घट होत आहे. शिवाय राज्यामध्ये लसीकरण देखील चांगल्या प्रमाणात झाले आहे. राज्यामध्ये शनिवारी ८९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जवळपास २१ ठिकाणी १० पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. शनिवारी सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. मुंबईपेक्षा देखील पुण्यात रुग्णांची संख्या जास्त आहे.

पुणे मनपामध्ये आज १७४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी- चिंचवड (Pimpri-Chinchwad) मनपामध्ये ६६ रुग्णांची भर पडली आहे. शिवाय पुणे ग्रामीण (Rural) ७७ रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये आज ८९ रुग्णांची भर पडली आहे. ठाणे मनपा परिसरामध्ये २१ रुग्णांची नोंद झाली आहे. रायगडमध्ये २४ रुग्ण आढळले आहेत. तर नाशिकमध्ये ३९, अहमदनगरमध्ये ६४, बुलढाणा ४२, नागपूर २१ , नागपूर मनपा २३ आणि गडचिरोलीमध्ये २३ नवे रुग्ण आढळले आहेत. चंद्रपूर, सांगली मिरज कुपवाड मनपा, मालेगाव मनपामध्ये आज एक देखील रुग्ण आढळला नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com