Ambernath News Saam Tv
मुंबई/पुणे

अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर चौक खड्ड्यात; पेव्हर ब्लॉक तुटल्यानं रस्त्याची चाळण

नगरपालिका प्रशासनाचं रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

अजय दुधाणे

अंबरनाथ - अंबरनाथचा (Ambernath) महालक्ष्मीनगर चौक सध्या पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. या चौकात लावलेले पेव्हर ब्लॉक तुटले असून त्यामुळं या चौकात रास्तच उरलेला नाही आहे. त्यामुळं या चौकातून गाड्या चालवणं सोडा, साधं चालणं देखील कठीण होऊन बसलं आहे. अंबरनाथचा महालक्ष्मीनगर चौक हा अंबरनाथ पूर्वेतील एक प्रमुख चौक समजला जातो. महालक्ष्मीनगर, श्रीकृष्णगर, गॅस गोडाऊन, म्हाडा कॉलनी नवरे नगर परिसरात जाण्यासाठी हा महत्त्वाचा चौक ओलांडूनच पुढे जावं लागतं. त्यामुळे या रस्त्यावर रिक्षा, खासगी वाहनं यांची नेहमीच वर्दळ असते. याच चौकात रिक्षास्टॅंडदेखील आहे.

हे देखील पाहा -

या चौकात रस्त्याचं काम करताना काँक्रिटीकरण न करता पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले होते. हे पेव्हर ब्लॉक सुद्धा निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे काही वर्षातच पेव्हर ब्लॉकची झीज होऊन त्यांचा अक्षरशः चुरा झाला आहे. मात्र याकडे कुणाचंही लक्ष नसल्यानं चौक पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. याचा वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास होत आहे.

अंबरनाथच्या शिवाजीनगर गणपती मंदिराकडून महालक्ष्मीनगर चौकाकडे जाताना अनेक ठिकाणी रस्त्याची अशीच बिकट अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी काँक्रीट रस्त्याच्या दोन भागांना जोडण्यासाठी लावलेल्या पेव्हर ब्लॉकचा अक्षरशः चुरा झाला असून या खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज न येऊन अपघात घडतायत. त्यामुळं या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देऊन युद्धपातळीवर ही कामं होण्याची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

SCROLL FOR NEXT