सुलेमानी खडा विक्रीच्या नावाखाली पुणेकरास पाच लाखांस गंडविले

या टोळीकडून लुटलेली पाच लाखांची रक्कमही हस्तगत करण्यात आली.
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On

सोलापूर: दुर्मीळ आणि लाभदायक मानल्या जाणाऱ्या सुलेमानी खडा विकण्याच्या नावाखाली व्यवहार ठरविताना ऐनवेळी पोलीस छापा पडल्याचे दाखवत पुण्यातील एका व्यक्तीकडून पाच लाख रूपयांची रोकड हिसकावून घेणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला सोलापुरात पोलिसांनी (Police) अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. या टोळीकडून लुटलेली पाच लाखांची रक्कमही हस्तगत करण्यात आली.

सिराज मोहम्मद हाशम शेख, इम्रान इलाहीखान पठाण आणि सलमान जैनोद्दीन नदाफ अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यासंदर्भात सूर्यकांत आढाळगे यांनी सोलापुरातील (Solapur) सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

Solapur News
'शिवसेनेचा व्हिप आम्हाला लागू होत नाही'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोलापुरात एक व्यक्ती सुलेमानी खड्याची विक्री करतो. सुलेमानी खडा दुर्मीळ असून, तो अतिशय लाभदायक मानला जातो. हा खडा वापरल्यास कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही. आयुष्यात भभराटच होते, अशी माहिती सूर्यकांत आढाळगे यांना एका मित्राकडून समजली. सुलेमानी खड्याची किंमत पाच लाख रूपये असून हा खडा विकत घेण्यापूर्वी संबंधित विक्रेत्याला समक्ष भेटून व्यवहाराची खात्री देण्यासाठी ठरलेली पाच लाखांची रक्कम प्रत्यक्ष दाखवावी लागते, अशीही माहिती आढाळगे यांना समजली. त्यानुसार त्यांना सुलेमानी खडा विकत घेण्याचा मोह झाला.

सुलेमानी खडा खरेदीसाठी केरळ आणि कोल्हापूरहूनही काही लोक येणार आहेत, असे आढाळगे यांना सांगितले गेले. सुलेमानी खडा खरेदी विक्रीसाठी व्यवहार करण्यासाठी सोलापुरात हॉटेल लोटसमध्ये एकत्र येण्याचे ठरले. आढाळगे यांनी या व्यवहारासाठी हॉटेलमध्ये स्वतः खोली घेतली. ठरल्याप्रमाणे जफरभाई नावाची व्यक्ती आणि इतर चारजण हॉटेलमध्ये खोलीत होते. सुलेमानी खडा खरेदीसाठी आणलेली पाच लाखांची रक्कम आढाळगे यांनी दाखवून जफरभाई यास खात्री पटवून दिली, पण त्याचवेळी त्यांच्या खोलीत दोघेजण आले आणि आम्ही गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगत सर्वांना धमकावले.

Solapur News
राहुल गांधींनी चिमुकलीला दिला चॉकलेट, सेल्फी घेतला; देशाला असं वातावरण हवंय!, काँग्रेसचं ट्विट

आढाळगे यांनाही शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून त्यांना खीलीतून बाहेर पडण्यास मज्जाव केला. नंतर त्या दोघा तोतया पोलिसांसह (Police) जफारभाई यांनी आढाळगे यांच्या हातातील पाच लाखांची रोकड असलेली पिशवी हिसकावून घेऊन त्यांना पळवून लावले. ही फसवणूक लक्षात आल्यानंतर आढाळगे यांनी पोलिसांत धाव घेतली. या गुन्ह्याची उकल होण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आणि अवघ्या दोन तासांत संबंधित टोळीला सोलापूर पोलिसांनी पकडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com