Ashadhi Wari 2022 Accident Saam TV
मुंबई/पुणे

दिंडीत घुसला भरधाव कंटनेर; एका वारकऱ्याचा मृत्यू; तीन जखमी

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा प्रस्थानाच्या दिवशीच एका वारकऱ्यावर काळाने घाला घातल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी: संत तुकाराम महाराजांच्या (Sant Tukaram Maharaj) पालखी सोहळा प्रस्थानाच्या दिवशीच एका वारकऱ्यावर काळाने घाला घातल आहे. देहूहून (Dehu) आळंदीकडे पायी जात असणाऱ्या दिंडीमध्ये भरधाव वेगाने आलेला कंटेनर शिरल्यामुळे एका वारकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. तर अन्य ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

सदर घटना काल सोमवारी सायंकाळी देहू-आळंदी मार्गावरील (Dehu-Alandi Route) चिखली येथे घडली. या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे (Warkari) नाव भगवान साहेबराव घुगे वय वर्ष ३० रा. दगडवाडी, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा असे आहे. तर भिकाजी बनसोडे, पुंजाबाई हुसे, बबन जयभाये सर्व रा. दगडवाडी, ता. देऊळगावराजा, जि. बुलढाणा (Buldhana) अशी जखमी वारकऱ्यांची नावं आहेत. या अपघाता प्रकरणी भास्कर बाजीराव जायभाये यांनी फिर्याद दिल्यानुसार वाहन चालक जगन्नाथ भानुदास मुंडे (चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे.

काल सायंकाळी हे वारकरी देहू येथे दर्शन घेवून आळंदीकडे (Alandi) पायी जात होते. त्यावेळी कॅनबे चौक ते चिखली या दरम्यान एका भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली . यामध्ये भगवान साहेबराव घुगे यांचा मृत्यू झाला. तर अन्य तीनजण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये (Dehuroad Police Station) या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल असून कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रेमाचं जाळं, ब्लॅकमेलिंगचा फास, अमरावतीत 180 मुलींचं लैगिक शोषण

Tueday Horoscope: आज तुमचे जवळच्या व्यक्तींसोबत मतभेद होतील, वाचा राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

SCROLL FOR NEXT