'अकेला देवेंद्र क्या करेंगा म्हणणाऱ्यांना...' ; भाजप नेत्याचा महाविकास आघाडीवर घणाघात

विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) पाचही उमदेवार जिंकले आहेत. या भाजपच्या विजयानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Saam Tv
Published On

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेसाठी आज निवडणूक झाली. ही निवडणूक (Election) राज्यसभेसारखीच चुरशीची झाली. भाजपने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली होती. या निवडणुकीत पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता लागली होती. आता या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) पाचही उमदेवार जिंकले आहेत. या भाजपच्या विजयानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra vidhan parishad election 2022)

Devendra Fadnavis
MLC Election 2022: भाजपचा पुन्हा महाविकास आघाडीला धक्का; प्रसाद लाड विजयी

प्रवीण दरेकर म्हणाले, 'आम्ही आनंदी आहोत. अकेला देवेंद्र क्या करेंगा म्हणणाऱ्यांना चपखल उत्तर मिळालं आहे. जनतेचं नेमकं मत काय ते या दोन निवडणुकांमधून दिसलं. मुक्ता टिळक , लक्ष्मण जगताप यांचे आभार. सरकार काम करू शकत नाही याचा राग असंतोष व्यक्त झाला. देवेंद्र फडणवीस लोकाभिमुख नेतृत्व महाराष्ट्रचं आहे , हे अधोरेखित झालं आहे. राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करू शकतात. गेम करण्याचा प्रश्न नाही, सरकारवर नाराजी आहे ते आमदारांनी व्यक्त केलं आहे. अडीच वर्षात ना सत्तेतील समाधानी आहेत, ना अपक्ष आमदार समाधानी आहेत'.

Devendra Fadnavis
महाविकास आघाडीला मोठा झटका; काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत, भाई जगताप विजयी

लोकाभिमुख सरकार आणल्यानंतर आमचा संघर्ष संपेल: देवेंद्र फडणवीस

दरम्यान, महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का देत भाजपने विधान परिषदेत पाच जागांवर विजय मिळवला. भाजपने (BJP) मोठा जल्लोष सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'महाविकास आघाडीवर सरकारवर आमदारांचा विश्वास नाही, म्हणून आमदारांनी आमच्या पाचव्या उमेदवाराला मत दिली, त्यामुळे आमचा प्रचंड मोठा विजय झाला आहे', असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

'आमचा संघर्ष सत्तेकरता नाही, आमचा संघर्ष समाजासाठी आहे. मी अपक्षांचेही आभार मानतो, त्यांनी आमचे पाच उमेदवार निवडून आणले आहेत. आम्ही समाजासाठी लढणार आहे', असंही फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com