मुंबईत कोरोनाच्या सावटाखाली पाच दिवसांच्या बाप्पाला आणि गौराईला निरोप Saam Tv News
मुंबई/पुणे

मुंबईत कोरोनाच्या सावटाखाली पाच दिवसांच्या बाप्पाला आणि गौराईला निरोप

गेले ५ दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल मुंबईत कोरोनाच्या सावटाखाली लाडक्या बाप्पाला आणि गौराईला निरोप देण्यात आला.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: गेले ५ दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल मुंबईत कोरोनाच्या सावटाखाली लाडक्या बाप्पाला आणि गौराईला निरोप देण्यात आला. मुंबईत पालिकेने गणेश विसर्जनासाठी कोरोनामुळे काही अटी घालून दिल्या होत्या, या नियमांत राहूनच कालचा सगळा विसर्जन सोहळा पार पडला. कालच्या विसर्जन सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, त्यासाठी पालिकेने विसर्जनाचं पूर्ण नियोजन केलं होतं. ठीक-ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले होते तर पोलिसांनी देखील जागोजागी कुंपण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतलेली दिसली. (Immersion of Bappa and Gaurai for five days under the auspices of Corona in Mumbai)

हे देखील पहा -

काल दिवसभरात मुंबईत बाप्पाच्या आणि गौराईच्या एकूण ६६ हजार २९९ मूर्ती विसर्जित करण्यात आल्यात. यात सार्वजनिक १ हजार १९३, घरगुती ५९ हजार १५३ तर गौरीच्या ५ हजार ९५३ मूर्तींचं विसर्जन करण्यात आलंय. यंदादेखील पालिकेने कृत्रिम आणि फिरते तलाव तयार केले होते. अश्या कृत्रीम तलावात ३४ हजार २९९ इतक्या सार्वजनिक, घरगुती बाप्पाच्या आणि गौराईच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्यात.

गिरगाव चौपाटीवर यंदा गणेश विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणी करून वेळ घ्यायची होती. चौपाटीवर गेल्यानंतर पालिकेचे कर्मचारीच मूर्ती विसर्जित करणार होते. दरम्यान काल या गिरगाव चौपाटीवर सार्वजनिक ११, घरगुती १ हजार १८६ आणि गौराईच्या १०८ अश्या एकूण १ हजार ३०५ मूर्तींच विसर्जन करण्यात आलंय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपआधी भारताला मोठा धक्का, महत्वाच्या खेळाडूला दुखापत; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Solapur News : सोलापुरात आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी आमदाराकडून मटण पार्टी; मंत्री जयकुमार गोरे यांचा आरोप

How To Stop Hair Fall: केस धुतल्यानंतर जर तुम्ही या चुका केल्या तर तुम्हाला टक्कल पडू शकत, घ्या आजपासूनच काळजी

ट्रेन की OYO? तरूणीच्या अंगावर तरूण बिलगून झोपला अन्...; सीटवर कपलचं नको ते कृत्य, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local Train: मुंबईत लोकलच्या दरवाजावर लटकून तरुणाची स्टंटबाजी, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT