केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाशिक पोलिसांना पत्र

25 सप्टेंबरला ऑनलाईन प्रणालीद्वारे जबाब नोंदवणार
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाशिक पोलिसांना पत्र
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाशिक पोलिसांना पत्रSaam Tv
Published On

नाशिक - केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांच्यावर नाशिक पोलिसांनी Nashik Police गुन्हा दाखल केल्याने त्यांना 2 सप्टेंबरला रोजी नाशिकला हजर राहायचे होते. मात्र उच्च न्यायालयाने High Court 17 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिल्याने आता केंद्रीय मंत्री नारायण राणे 25 सप्टेंबरला ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत. तसे पत्र राणे यांनी पोलिसांना पाठवल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसांत राणेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात उच्च न्यायालयाने राणे यांचा जामीन मंजूर करताना 17 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाशिक पोलिसांना पत्र
...म्हणून लसीथ मलिंगा ने केली निवृत्तीची घोषणा

त्यामुळे आता नाशिक पोलीस राणे यांचे 25 सप्टेंबरला ऑनलाईन जबाब घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी राणेंच्या वकिलांशी बोलून 25 सप्टेंबर रोजी ऑनलाइन जबाब घेण्याचे निश्चित केले आहे. यावेळी पोलीस त्यांना प्रश्न विचारणार असून राणेंच्या उत्तरानुसार पोलीस जबाब नोंदवून घेणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com