Maharashtra Rain Alert  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Updates: येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Weather Updates: राज्यात पूर्णपणे मान्सून दाखल झाला असला तरी अद्यापही काही जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या रडखडल्या असून बळीराजा संकटात सापडला आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील ओढवलं आहे. मात्र, आता मोसमी वाऱ्याचा मागील दोन दिवसांपासून जोर वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे १९ ते २२ जुलै या काळात राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात येणाऱ्या मोसमी वाऱ्याचा जोर वाढला असून बाष्पांनी भरलेले ढग पश्चिम घाट ओलांडून पुढे जात आहे. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात येत्या १९ ते २२ जुलै रोजी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान खात्याने (IMD Alert) जारी केलेल्या अंदाजनुसार, किनारपट्टीवर मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, शुक्रवारी मुंबईसह उपनगरात पावसाने दमदार पुनरागमन केलं. कोकणातही शुक्रवारी सकाळपासून मुसळघधार पाऊस झाला. आता पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यात दमदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून मिटकरींचा मुख्यमंत्र्यांना टोला; शिरसाटांनाही सुनावलं

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

Latest Designs Saree: महिलांसाठी कमळाच्या डिझाईन्सच्या साड्या, लेटेस्ट ट्रेडिंग 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT