Marathwada Floods Saam tv
मुंबई/पुणे

Marathwada Floods : पाऊस थांबेना, संकट संपेना! मराठवाड्यावर पावसाचं सावट कायम, हवामान विभागाने काय इशारा दिला?

Marathwada Floods update : मराठवाड्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याने मराठवाड्यातील नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे.

Vishal Gangurde

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान

मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.

हवामान विभागाकडून मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट

सचिन जाधव, साम टीव्ही

राज्याच्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडाला आहे. पुराने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासून हिरावून घेतला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आलेत. तर मागील ४ दिवसांत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाचा १५० हून अधिक गावांना फटका बसला आहे. मात्र, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं संकट संपेना झाला आहे. हवामान विभागाने मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.

पुण्यातील हवामान तज्ज्ञ एस डी सानप यांनी मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. सानप यांनी सांगितलं की, 'राज्यासाठी येत्या दोन दिवसांत म्हणजे आज आणि उद्या येलो अलर्ट आहे. राज्यात २७ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. आता मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र घाटमाथ्यावरही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे'.

'२७,२८,२९ सप्टेंबर या काळात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 29,30 सप्टेंबरनंतर पाऊस कमी होणार आहे. विदर्भातील काही भागात दोन दिवस येलो अलर्ट आहे. कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात कमी झाल्यामुळे पश्चिमेकडे त्याची हालचाल होती. ला नीना आहे की नाही अजून जाहीर केलं नाही, आता तटस्थ परिस्थिती आहे. येणाऱ्या ऑक्टोबर,नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात ला निना निर्माण होण्याची शक्यता ७४ टक्के आहे. आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत, असेही सानप यांनी सांगितलं.

'थंडीचा अंदाज हा सप्टेंबर महिन्याच्या शेवटी दिला जाईल. जास्त पाऊस झाला तर थंडी जास्त होईल, असा काही संबंध नाही. हे बदल होत असतात दरवर्षी ला निना बदलला तर तसं होऊ शकतं. पुढच्या महिन्याच्या अखेर आपल्याला ला नीना बाबत कळेल. ला नीना चांगला असला की हिवाळा चांगला असतो असं बोललं जातं. ला निना निर्माण व्हायला ऑक्टोबर महिन्याची शेवट वाट बघायला लागेल. आता यावर बोलणे योग्य नाही. येणाऱ्या पाच-सहा दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT