IIT Bombay student death 
मुंबई/पुणे

IIT मुंबईत विद्यार्थ्यानं जीवनयात्रा संपवली; प्रशासनाविरोधात विद्यार्थी आक्रमक, रात्रभर कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन

IIT Bombay student death : आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी रात्रभर धरणे आंदोलन केले. निलंबनाच्या धमकीचा आरोप विद्यार्थी करत आहेत.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईच्या (IIT Bombay) पवई कॅम्पसमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. बी.टेकच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली. साहिलचा मृतदेह आढळल्यानंतर कॅम्पसमध्ये एकच खळबळ उडाली, संतप्त विद्यार्थ्यांनी रात्री रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले.

निलंबनाच्या धमकीचा गंभीर आरोप

साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटीमधील विद्यार्थी अत्यंत आक्रमक झाले. संबंधित प्राध्यापकाने (प्रोफेसर) साहिलला एका वर्षासाठी निलंबित करण्याची धमकी दिली होती, असा गंभीर आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे. याच मानसिक तणावातून आणि भीतीपोटी साहिलने आत्महत्या केल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ काल मध्यरात्री अनेक तास शेकडो विद्यार्थी आयआयटी कॅम्पसमध्ये धरणे आंदोलनाला बसले होते.

मोबाईल अन् Chat GPT चा वापर

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर आयआयटी प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षा सुरू असताना साहिल मोबाईलवर 'Chat GPT' या एआय प्लॅटफॉर्मवरून प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून उत्तरांचा शोध घेत असल्याचे परीक्षा निरीक्षकांच्या निदर्शनास आले होते. यानंतर नियमानुसार त्याला केवळ समुपदेशन (Counselling) करण्यात आले होते. त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई किंवा निलंबन करण्यात आले नव्हते, असा दावा आयआयटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कॅम्पसमध्ये पोलिसांचा मोठा ताफा तैनात

विद्यार्थ्यांचा वाढता आक्रोश पाहता पवई पोलिसांनी तातडीने आयआयटी कॅम्पसमध्ये धाव घेतली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक तास आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

सध्या पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्राध्यापकांवर करण्यात आलेल्या आरोपांमागे किती तथ्य आहे, तसेच साहिलच्या आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.

संचालकांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक

दरम्यान, या घटनेनंतर मृत साहिलच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. "या दुर्दैवी घटनेला आयआयटी प्रशासन पूर्णपणे जबाबदार असून, जोपर्यंत जबाबदारांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही," असा ठाम पवित्रा पालकांनी घेतला आहे. गुन्हा नोंदवण्यासाठी साहिलचे वडील स्वतः पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले असून, पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

दुसरीकडे, कॅम्पसमधील विद्यार्थ्यांचा आक्रोश अधिकच वाढला आहे. विद्यार्थ्यांनी थेट आयआयटी डायरेक्टर (IIT Director) आणि डेन्सा डोला यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली आहे. सध्या आयआयटी परिसरात अत्यंत तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper water benefits: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी तांब्याचं पाणी; योग्य वेळ कोणती?

Maharashtra News Live Update: मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३.७० टक्के इतकाच पाऊस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' तारखेला येणार ₹१,५००; ऑगस्ट हप्त्याची नवीन अपडेट समोर

Heart Attack : रात्री झोपताना हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? नकळत तुमच्याकडून होणाऱ्या ३ चुका कारणीभूत

Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कुठे कसा राहील पावसाचा अंदाज? कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी इशारा

SCROLL FOR NEXT