Surabhi Jayashree Jagdish
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी ई. कोलाई बॅक्टेरियावर परिणाम करते. २०१२ मध्ये नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात तांब्याच्या पाण्याचा याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.
तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात. तांब्यामध्ये जंतू नष्ट करण्याची क्षमता असल्याचं वैज्ञानिक संशोधनातून समोर आलंय. काही तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यातील काही हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात.
आयुर्वेदानुसार, तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध राहण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल योग्य पातळीवर राहिल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते. यामुळे ब्लॉकेज, उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक यांसारख्या समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते.
तांब्याचं पाणी पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. यामुळे अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास आणि शरीराला अन्नातून पोषण मिळण्यास मदत होते. पचनक्रिया व्यवस्थित राहिल्याने वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होते.
तांब्याच्या पाण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामुळे शरीराला विविध आजारांशी लढण्यास मदत मिळते. तांब्यामध्ये असलेले गुणधर्म शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेलं पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं. सकाळी हे पाणी प्यायल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी आणि संपूर्ण शरीराच्या सिस्टीमसाठी फायदा होतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याने करण्याची पद्धत आरोग्यासाठी चांगली मानली जाते.
आजच्या काळात हार्ट अटॅकच्या समस्या वाढत असताना तांब्याचं पाणी हा नैसर्गिक उपाय म्हणून उपयोगी ठरतो. हे पाणी स्वस्त आणि सहज उपलब्ध असण्यासोबतच आरोग्यासाठी अनेक फायदे ठरतं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.