IIM Placement Saam Tv
मुंबई/पुणे

IIM Mumbai Placements: मायक्रोसॉफ्टकडून ५४ लाखांचं पॅकेज, IIM मुंबईमध्ये पहिल्या टप्प्यात १०० % प्लेसमेंट

IIM Mum achieves 100% placement in 1st phase: आयआयएम प्लेसमेंटचा पहिला टप्पा २५ नोव्हेंबरला सुरू झाला. ज्यातून २० महिन्यांपेक्षा कमी कामाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना जानेवारीपासून नियुक्त केले जाईल. सहभागी झालेल्या ७८ कंपन्यापैकी २० कंपन्या या पहिल्यांदाच आयआयएम प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांची निवड करणार आहेत.

Bhagyashree Kamble

प्रत्येकाला कॉलेजमध्ये उत्तम शिक्षण घेतल्यानंतर चांगला जॉब मिळावा अशी अपेक्षा असते. काहींना कॉलेज प्लेसमेंटकडून जॉब मिळतात. यंदा आयआयएम मुंबईच्या विद्यार्थ्यांचं १०० टक्के प्लेसमेंट झालं आहे. अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांना संधी दिली. तसेच प्रेशर्स विद्यार्थ्यांना उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनीने सर्वाधिक ५४ लाख वार्षिक वेतन देऊ केली आहे.

आयआयएम प्लेसमेंटचा पहिला टप्पा २५ नोव्हेंबरला सुरू झाला. ज्यातून २० महिन्यांपेक्षा कमी कामाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांना जानेवारीपासून नियुक्त केले जाईल. सहभागी झालेल्या ७८ कंपन्यापैकी २० कंपन्या या पहिल्यांदाच आयआयएम प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांची निवड करणार आहेत. तर, एक्सेंचर ही कंपनी ४१ ऑफरसह सर्वात मोठी भरती देणारी कंपनी ठरली आली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या कंपनीनं दुप्पटीने भरती जारी केली आहे. तसेच ३७ लाखांचं वार्षिक पॅकेज ऑफर केलं आहे.

'या वर्षीचं प्लेसमेंट खूप चांगलं झालं आहे. ज्या कंपन्या गेल्या वर्षी दोन किंवा तीन उमेदवारांना कामावर घेत होत्या. त्या कंपन्या आता डबल डिजीटमध्ये विद्यार्थ्यांना संधी देत आहेत. कंपन्यांचा विद्यार्थ्यांप्रति सकारात्मक दृष्टिकोन आहे. खासकरून लॉजिस्टिक्स आणि कन्सल्टन्सी क्षेत्रातील कंपन्या जॉब ऑफर करीत आहेत. ज्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होईल.' असं आयआयएम मुंबईचे प्लेसमेंट चेअरपर्सन नीरज पांडे म्हणाले.

पुढे ते म्हणतात, 'मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्त प्लेसमेंट आल्या आहेत. अनुभव असलेले किंवा प्रेशर्स, नावाजलेल्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. बाकी विद्यार्थ्यांची दुसरी फेरी जानेवारीमध्ये होईल.' ऑपरेशन आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट यांसारख्या ट्रेडिशनल क्षेत्रांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अनेक कंपन्यांनी महत्त्वपूर्ण जागांसाठी पदवीधरांची नियुक्ती केली आहे.

२०२६ च्या वर्गासाठी उन्हाळी इंटरशिप प्रक्रियेला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एकूण १२८ कंपन्यांनी ४२५ विद्यार्थ्यांना इंटरशिप ऑफर केली आहे. इंटरशिप करत असलेल्या विद्यार्थ्यांना ३ लाख रूपयांपर्यंत स्टायपेंड देण्यात येईल. बिझनेस इंटर्नशिप स्पेसमध्ये बेंचमार्क सेट करून कोका कोलाने सर्वाधिक ५ लाख रूपये स्टायपेंड ऑफर केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT