Uddhav Thackeray On Corona
Uddhav Thackeray On Corona Saam TV
मुंबई/पुणे

Corona Updates: निर्बंध नको असतील तर...; मुख्यमंत्र्यांनी दिला 'हा' गंभीर इशारा

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज वर्षा निवासस्थानी टास्क फोर्स सदस्यांसमवेत एका बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात जर कडक निर्बंध नको असतील तर, कोरोना नियमांचं पालन करावं लागेलं असं सांगितलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर मुंबई (Mumbai) शहरात इतर शहरांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात Corona रुग्ण वाढत आहेत. मुंबईत दिवसाला ५०० च्या वर रुग्ण सापडायला लागले आहेत. तर राज्यात दिवसाला कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण जवळपास हजाराच्या वर गेलं आहे.

हे देखील पाहा -

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये, पुन्हा कारानाचे निर्बंध लाव जाणार की काय, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही निर्बंध लादणार नसल्याचं सांगितलं आहे. मात्र, येत्या पंधरा दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी आजच्या बैठकीत सांगितलं आहे. तसंच कडक निर्बंध आणि मास्क (Mask) सक्ती केली नसली तरीही गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन -

ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तत्काळ कोविड चाचणी करुन घ्या.

गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा.

बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी.

आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी.

ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजार देखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनी देखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे असं देखील मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

Nawazuddin Siddiqui Net Worth : एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा नवाज आज आहे कोट्यवधींचा मालक

Chhagan Bhujabal News | मविआचा 35 जागांचा दावा भुजबळांनी असा खोडून काढला..

Delhi Metro: पुन्हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल; लेडीज कोचमध्ये मुलीचा अश्लील डान्स Watch video

Shakuntala Railways | अबब! चोरट्यांनी थेट रेल्वे ट्रॅकच पळवला!

SCROLL FOR NEXT