सावधान! रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पुढे गेला तर लॉकडाऊन- मुंबई महापौर Saam Tv
मुंबई/पुणे

सावधान! रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या पुढे गेला तर लॉकडाऊन- मुंबई महापौर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

सुमित सावंत

मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.

काल मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. महापौर म्हणाल्या, " काल चांगला निर्णय घेतलाय तो म्हणजे प्रत्यक्ष शाळा वर्ग बंद करण्याचा. कोरोना रुग्ण संख्या वाढतेय, ही बाब चिंताजनक आहे. चिंताजनक बाब लक्षात घेता निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांनी दोन डोस घेतलेले असावेत", असं त्यांनी आवाहन केलं.

पुढे त्या म्हणाल्या, शिवसेनेने गर्दी टाळण्यासाठी दोन कार्यक्रम रद्द केले आहेत. वांद्र्याच्या, जत्रेचा शो बंद केला आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली आहे. तसेच इतर पक्षांना आवाहन करत, इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील या गोष्टी समजून घ्यायला हवं.

"आपल्या कार्यकर्त्यांना, तसेच लोकांचा बळी जाऊ नये म्हणून मुख्यमंत्रांनी पुढाकार घेतला आहे. अजित दादा देखील काल बोलले की, ५०% उपस्थिती असेल तरच मी समारंभात येईन. त्यामुळे सुपरस्प्रेडर होऊ नये म्हणून काळजी घ्या".

हे देखील पहा-

मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईतील रुग्णसंख्या 20 हजारांच्या वर गेल्यास लॉकडाऊन लावण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यामुळे आता लॉकडाऊन असता कामा नये. आयुक्त आणि मनपा सर्व परिस्थितीवर लक्ष्य ठेऊन आहोत, असे महापौर म्हणाल्या. असे त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, आयुक्त स्वतः सगळ्या गोष्टीत लक्ष ठेवुन आहेत. महानगर पालिका म्हणून आमचं लक्ष आहे. टाळेबंदी नकोच आहे, कारण आता सगळे सवरत आहेत. पण प्रत्येकाने ठरवलं नियम पाळले, कोरोनाला रोखलं तर टाळेबंदी होणार नाही. पण २० हजारांच्या वर आकडा गेला, तर केंद्राने दिलेल्या नियमांची पूर्तता केली जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या, मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळला

SCROLL FOR NEXT