आमदार रमेश पाटील  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

हिंदुस्थानात हिंदूंची मंदिरे तोडली जात असतील तर आम्ही कदापी सहन करणार नाही

हिंदुस्थानात हिंदूंची मंदिरे तोडली जात असतील तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही असे वक्तव्य आमदार रमेश पाटील यांनी कल्याण मध्ये केले आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : हिंदुस्थानात हिंदूंची मंदिरे तोडली जात असतील तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही असे विधान आमदार रमेश पाटील यांनी कल्याण मध्ये केले आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील मच्छीविक्रेत्यांना केडीएमसीकडून परवाना वितरण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज मच्छीविक्रेता परवाना वितरण कार्यक्रम भाजपच्या वतीने कल्याणतील दामोदर हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता.

हे देखील पहा :

या कार्यक्रमासाठी मच्छीमार आणि कोळी लोकांनी गर्दी गेली होती. या कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील , आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते.यावेळी दोन्ही नेत्यांनी आम्ही मच्छी विक्रेत्यांच्या पाठीशी उभी आहोत असे सांगितले.

तर, यावेळी आमदार रमेश पाटील यांनी कल्याण मोहने येथिल मंदिरावर केडीएमसीने कारवाई केली यामुळे जो वाद झाला त्याबाबत बोलताना सांगितले की मंदिरावर तोडक कारवाई करण्याऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी असून याबाबत पालिका आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगितले. जर हिंदुस्थानात हिंदूंची मंदिरे तोडली जात असतील तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT