Washing machine overloading: वॉशिंग मशीनमध्ये एकावेळी किती कपडे धुणं योग्य असतं?

Surabhi Jayashree Jagdish

मशीनचं नुकसान

वॉशिंग मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरण्याच्या चुकीला ओव्हरलोडिंग म्हणतात. यामुळे मशीनच्या ड्रमवर आणि मोटरवर जास्त ताण येतो. सतत असं केल्यास मशीनच्या कामावर परिणाम होऊ शकतो आणि तिचे महत्त्वाचे भाग खराब होण्याची शक्यता असते.

Washing machine capacity | saam tv

कपड्यांची स्वच्छता

मशीनमध्ये खूप कपडे भरल्यास ड्रममध्ये त्यांना फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे कपड्यांमधील घाण आणि डिटर्जंट व्यवस्थित निघत नाही. परिणामी कपडे धुतल्यानंतरही अस्वच्छ राहू शकतात आणि त्यांना दुर्गंधी येऊ शकते.

Washing machine care tips | saam tv

वॉशिंग मशीनची क्षमता

बाजारात ६ किलो, ७ किलो आणि ८ किलो क्षमतेच्या वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत. मशीनची क्षमता म्हणजे एका वेळी ती किती वजनाचे कोरडे कपडे धुऊ शकते, हे दर्शवणारा आकडा असतो. त्यामुळे मशीनमध्ये कपडे टाकण्यापूर्वी तिची क्षमता तपासणं महत्त्वाचं आहे.

7kg washing machine capacity | saam tv

किती कपडे धुवावेत?

६ किलो क्षमतेच्या मशीनमध्ये हलके शर्ट आणि पँट मिळून साधारण ८ ते १० कपडे धुता येतात. ७ किलो क्षमतेच्या मशीनमध्ये साधारण ११ ते १३ कपडे धुता येतात. तर ८ किलो क्षमतेच्या मशीनमध्ये साधारण १४ ते १६ कपडे धुता येतात. मात्र कपड्यांचे वजन आणि जाडी यानुसार ही संख्या बदलू शकते.

Washing machine drum capacity | saam tv

कपडे धुण्यापूर्वी 'हँड रूल' वापरा

मशीनमध्ये कपडे टाकल्यानंतर ड्रमच्या वरच्या बाजूला थोडी जागा रिकामी ठेवा. त्यानंतर कपड्यांच्या वर आणि ड्रमच्या आतील भागामध्ये हात सहज फिरतोय का ते तपासा. हात फिरवण्यासाठी पुरेशी जागा नसेल, तर मशीनमधून काही कपडे बाहेर काढा.

Washing machine cleaning tips | saam tv

या गोष्टी केल्यास मशीन चांगली राहील

वॉशिंग मशीनचा ड्रम साधारण ७० ते ८० टक्केच भरण्याचा प्रयत्न करा आणि कपडे वरपर्यंत कोंबू नका. डिटर्जंट नेहमी त्याच्या पाकिटावर दिलेल्या प्रमाणानुसारच वापरा. जास्त डिटर्जंट टाकल्यास अतिरिक्त फेस तयार होतो आणि कपड्यांवर डिटर्जंटचे अवशेष राहू शकतात.

Correct washing machine load | saam tv

जड आणि हलके कपडे वेगवेगळे धुवा

जड जीन्स, टॉवेल आणि हलके शर्ट किंवा टी-शर्ट एकाच वेळी धुणं टाळा. जड कपड्यांमुळे ड्रममधील वजनाचं संतुलन बिघडू शकतं आणि कपडे धुण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जड आणि हलके कपडे वेगवेगळ्या वेळी धुवा आणि मशीनची क्षमता लक्षात घेऊनच कपडे भरा.

Laundry tips and tricks | saam tv

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CNG bike | saam tv
येथे क्लिक करा