Manorama Khedkar Arrested Saam TV
मुंबई/पुणे

Manorama Khedkar Arrested: नाव बदलून लॉजमध्ये राहिली, पोलिसांना गुंगारा द्यायला गेली पण अडकली, पाहा मनोरमा खेडकरांच्या अटकेचा CCTV व्हिडीओ

CCTV video of Manorama Khedkar being arrested: मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी १२ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार होत्या. ६ दिवशी त्यांना अटक करण्यात आली.

Priya More

नितीन पाटणकर, पुणे

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर यांना आज पोलिसांनी अटक केली. पुणे पोलिसांनी महाड येथील हॉटेलमधून त्यांना अटक केली. मनोरमा खेडकर यांच्यावर शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी १२ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या फरार होत्या. ६ दिवशी त्यांना अटक करण्यात आली. त्यांना पोलिसांनी पुण्यात आणले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी इथून अटक केली. मनोरमा खेडकर आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती रात्री ९.३० वाजता हिरकणीवाडी इथे आले होते. याठिकाणी असणाऱ्या पार्वती लॉजवर त्या बनावट नावावे राहिल्या.

दादासाहेब ढाकणे आणि इंदुताई ढाकणे अशी नावे त्यांनी मालकाला दिली. तसे आधारकार्ड देखील दाखवले. खोली क्रमांक २ मध्ये हे दोघे राहिले. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिस हिरकणीवाडी इथं पोहोचले. त्यांनी इथल्या सर्व लॉजेसची कसून तपासणी केली. अखेर मनोरमा खेडकर ज्या हॉटेलमध्ये राहिल्या होत्या तेथे पोलिस पोहोचले. मनोरमा खेडकर याच ठिकाणी राहत असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी साडेसहा वाजता पोलिसांनी त्यांना अटक केली.

मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर पुणे पोलिस त्यांना घेऊन पुण्यात आले. ⁠मनोरमा खेडकर भाड्यानं केलेल्या कारमधून प्रवास करत होत्या. भाडयाची कार, लॅाजवर राहणे याद्वारे त्यांनी ⁠पोलीसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला पण त्या फसल्या. पौड पोलिस ठाण्यामध्ये मनोरमा खेडकर यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली गेली. त्यानंतर मनोरमा खेडकर यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता त्यांना पौड न्यायालयात हजर केले जाणार आहे. पौड पोलिस न्यायालयाकडे मनोरमा खेडकर यांची रवानगी पोलिस कोठडीमध्ये करण्यात यावी अशी मागणी करणार आहेत.

⁠मनोरमा खेडकर आणि इतरांच्या विरोधात शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकावले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामुळे मनोरमा खेडकर पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात ३०७ म्हणजेच हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर यांची देखील एसीबीकडून कसून चौकशी सुरू आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

SCROLL FOR NEXT