
पाकिस्तान दहशतवादी कारवाया करणाऱ्या हाफिस सईद आणि मसूद अझरला भारताकडे सोपवणार आहे, होय, खुद्द पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी याबाबत भाष्य केलंय. मात्र यात त्यांनी भारतासमोर एक अट ठेवलीय. जर नवी दिल्लीने या प्रक्रियेत सहकार्य करण्याची तयारी दाखवली तर विश्वास निर्माण करण्यासाठी "तपासाधीन व्यक्तींना" भारताकडे प्रत्यार्पण करण्यास पाकिस्तानचा कोणताही आक्षेप नसेल असं भुट्टो म्हणालेत.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल यांनी शुक्रवारी अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं. डॉन वृत्तपत्रात त्यांच्या मुलाखतीची बातमी प्रसारित करण्यात आली होती. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) प्रमुख हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) प्रमुख मसूद अझहर यांना संभाव्य तडजोड आणि सद्भावना म्हणून भारताकडे प्रत्यार्पण करण्याबाबतच्या प्रश्न बिलावल भुट्टो यांना करण्यात आला होता.
त्याला उत्तर देताना बिलावल यांनी ही टिप्पणी केलीय. 'पाकिस्तानसोबतच्या व्यापक चर्चेचा एक भाग म्हणून, जिथे दहशतवाद हा आम्ही चर्चा करत असलेल्या मुद्द्यांपैकी एक आहे, मला खात्री आहे की पाकिस्तान यापैकी कोणत्याही गोष्टींना विरोध करणार नाही, असेही भुट्टो म्हणाले. दरम्यान राष्ट्रीय दहशतवाद विरोधी प्राधिकरण (नॅक्टा) नुसार, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दोन्ही संस्थांवर पाकिस्तानने बंदी घातली आहे, तर २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद सध्या दहशतवादाला आर्थिक मदत केल्याबद्दल ३३ वर्षांची शिक्षा भोगत आहे
संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केलेल्या अझहरवरही NACTA ने बंदी घातलीय. दरम्यान हाफिस सईद आणि मसूद अझहरविरुद्ध चालवले जाणारे खटले पाकिस्तानशी संबंधित होते.जसे की दहशतवादी कारवायांना निधी देणे. सीमापार दहशतवादासाठी त्यांच्यावर खटला चालवणे कठीण असल्यानं दिल्लीने मूलभूत गोष्टींचे "पालन" केलं नाही, त्यामुळे प्रत्यार्पण होऊ शकलं नसल्याचं भुट्टो म्हणाले. "भारत दोषसिद्धीसाठी आवश्यक असलेल्या काही मूलभूत गोष्टी करण्यास नकार देत आहे. पण हे महत्वाचं आहे. या न्यायालयांमध्ये पुरावे सादर करणे, भारतातून लोकांना साक्ष देण्यासाठी येणे, कोणतेही प्रति-आरोप सहन करणं यासाठी भारत तयार नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.