IAS Tukaram Mundhe Transfer  Saam tv
मुंबई/पुणे

IAS Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंची ४५ दिवसांत पुन्हा बदली; आता कुठे झाली नियुक्ती?

IAS Tukaram Mundhe Transfer : IAS तुकाराम मुंढेंची ४५ दिवसांत पुन्हा बदली झाली आहे. मुंढेंची बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

प्रशासनात पुन्हा फेरबदल

आयएएस तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी करण्यात आली नियुक्ती

मुंबई : राज्याच्या प्रशासनात पुन्हा एकदा फेरबदल करण्यात आले आहेत. प्रशासकीय सेवेत अत्यंत डॅशिंग आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची ४५ दिवसांत पुन्हा बदली झाली आहे. त्यांची गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत २५ वेळा बदली झाली आहे. अवघ्या दीड महिन्यात बदली झाल्याने प्रशासकीय व्यवस्थेच्या निर्णयाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यंदा तुकाराम मुंढे यांची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

काही दिवसांपूर्वी २००५ बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापान, मदत आणि पुनर्वसन, महसूल व वन विभागाच्या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची केवळ दीड महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. या नियमानुसार तीन वर्ष काम करणे अपेक्षित असताना मुंढे यांची अवघ्या ४५ दिवसांत बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैली आणि निर्णयाने सर्वसामान्यांना नेहमीच दिलासा मिळत आलेला आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही त्यांचा अंकुश असतो, असे बोलले जाते. राजकीय हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळे सत्ताधाऱ्यांच्या पसंतीस उतरत नाहीत, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. शासनाने त्यांना लवकरात लवकर नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल करण्यात आला होता. पोलीस दलातील तब्बल ९६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, संभाजीनगरमधील अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अप्पर पोलीस महासंचालक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्देश दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही? करा ‘हे’ 7 उपाय, माता लक्ष्मीच्या आशिर्वादाने होईल धनलाभ

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का! 8व्या वेतन आयोगामुळे पगारवाढ लांबणीवर? कधीपर्यंत होणार वाचा सविस्तर...

Daily salt intake: दररोज किती मीठ खावं? WHOने सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतात, वाचा

Maharashtra News Live Update: Gen Z वर फोकस करा आणि त्यांच्याशी संपर्क ठेवा- राज ठाकरे

Political News : राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत, एकाचवेळी दिल्ली आणि राज्यात हालचाली

SCROLL FOR NEXT