IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

IAS Officers Transfers: उत्तर प्रदेशातील बदलीची गाडी थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सोमवारी पुन्हा १० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह २४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
IAS Transfers :
ias officer transfer Saam tv
Published On
Summary
  • यूपीमध्ये पुन्हा २४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • १० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची अदलाबदल

  • याआधीही ४० अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या

उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांच्या बदल्याची गाडी काही थांबताना दिसत नाहीये. सोमवारी पुन्हा संध्याकाळी १० जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह २४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या आधी रविवारी रात्रीही १५ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह ४० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा २४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

IAS Transfers :
Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

या बदल्यांमध्ये शशांक त्रिपाठी यांची अयोध्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर अयोध्याचे आधीचे जिल्हाधिकारी निखिल टीकाराम फुंडे यांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुख्य सचिव नियुक्त करण्यात आले आहे. तर यासह गाझीपूरचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांना अलीगडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

IAS Transfers :
IPS Officer Transfers: तुषार दोशींसह ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोलीस दलात खळबळ

आयएएस अरविंद सिंह, अप्पर भूमी व्यवस्था आयुक्त महसूल परिषदेची एटाच्या नवीन जिल्हाधिकाऱ्यापदी नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विशेष सचिव, आयएएस अमित असेरी यांची बांदाच्या नवीन जिल्हाधिकाऱ्यापदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुलंदशहर-खुर्जा विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष, आयएएस अंकुर लाथर यांची फर्रुखाबादच्या नवीन जिल्हाधिकाऱ्यापदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुझफ्फरनगर विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष, आयएएस कविता मीना यांची हापूरच्या नव्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यटन विभागाच्या विशेष सचिव, आयएएस ईशा प्रिया यांची आंबेडकर नगरच्या नव्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कानपूर नगर येथील उत्तर प्रदेश राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएएस चर्चित गौर यांची सोनभद्रच्या नव्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त बाराबंकीचे माजी जिल्हाधिकारी शशांक त्रिपाठी यांची अयोध्या येथे नियुक्ती करण्यात आली आहे. आयएएस अधिकारी ईशान प्रताप सिंह यांची बाराबंकीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ईशान प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव आणि नागरी हवाई वाहतूक विभाग या पदांवर काम पाहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com