Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: 'तुझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी..' पती नंपुसक, पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी मित्राला घरी बोलवलं अन् मग

Pune Couples Troubled Relationship Takes Dark Turn: पतीने आपल्या मित्राला आपल्याच बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी घरी बोलावून घेतलं होतं. हा सर्व प्रकार पीडित महिलेला समजताच तिने पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच पु्ण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पतीने आपल्या मित्राला आपल्याच बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी घरी बोलावून घेतलं होतं. पती नपुंसक आहे. पत्नीला बाळ व्हावे आणि आपले पौरूषत्व दिसून यावे, यासाठी पतीने आपल्या मित्राला घरी बोलावून घेतलं होतं. तसेच त्याला पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले.

हा सर्व प्रकार पीडित महिलेला समजताच तिने पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

नेमकं घडलं काय?

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला ही पुण्यातील रहिवासी आहे. तर, पती हा सांगलीचा आहे. सध्या तो पुण्यात असल्याची माहिती आहे. सांगलीत सासरी राहत असताना दोघांमध्ये सतत भांडण होत. राग अनावर झाल्यास पती पत्नीला मारहाणही करायचा. पती नपुंसक असल्याकारणाने त्यांना बाळ होत नव्हतं. ६ महिन्यांपूर्वी महिला तिच्या माहेरी पुण्यात निघून गेली.

पती देखील पु्ण्यात स्थायिक झाला. त्यानंतर त्याने आपल्या मित्राला बोलावून घेतलं. 'मित्र आज इथेच राहणार आहे, त्यासाठी आज जेवण तयार कर', असं नवरा बायकोला म्हणाला. नंतर मित्राने विवाहित महिलेकडे वेगळ्याच नजरेने पाहिले. महिलेला या गोष्टीचा राग आला. तिने थेट पतीला सांगितले. नंतर पत्नीचे काही म्हणणे न ऐकता त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यावेळी महिला माहेरी निघून गेली.

१७ मार्चला पतीच्या मित्राने महिलेला फोन केला. 'तुझ्या पतीचा लैंगिक प्रॉब्लेम आहे. तो नपुंसक आहे. त्याने तुझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी मला घरी बोलावून घेतलं होतं', अशी माहिती त्याने दिली. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच पती आणि त्याच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT