Beed Crime: बायको नगरसेविका, मुंडे-वाल्मिकसाठी काम; देशमुख प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, सुग्रीव कराड आहे तरी कोण?

Sugriv Karad Role in Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता सुग्रीव कराडचे नाव समोर येत आहे. दरम्यान, सुग्रीव कराड नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Beed
BeedSaam
Published On

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येमागील अनेक धागेदोरे आता समोर येत आहेत. या प्रकरणात आरोपींनी सुग्रीव कराड याचे नाव घेतल्यामुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेवर हल्ला केला होता, अशी माहिती आरोपींनी दिली होती. त्यामुळे सुग्रीव कराड नक्की कोण आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हत्येप्रकरणातील नव्या तपासाचा धागा

या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह आठ आरोपींची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी दिलेल्या जबाबात सुग्रीव कराड याचे नाव घेतले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला केला होता. अशी माहिती आरोपींनी दिली.

Beed
Crime: बायको सतत फोनवर व्यस्त, नवऱ्याला आला राग; मुलं शाळेत असतानाच बायकोला संपवलं

सुग्रीव कराड नक्की कोण?

सुग्रीव कराड हा केज तालुक्याचा रहिवासी. तो एका राजकीय कुटुंबातील आहे. त्याची आई केज पंचायत समिती सदस्या होत्या, तर पत्नी नगरसेविका राहिल्या आहेत. मात्र, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Beed
Bhiwandi News: ह्रदयद्रावक! साखर झोपेत असतानाच स्लॅब कोसळला; ६ महिन्याच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

धनंजय मुंडे आणि सुग्रीव कराड यांचे संबंध

सुग्रीव कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गटासाठी काम करत होता. मात्र, मागील लोकसभा निवडणुकीत त्याची भूमिका संशयास्पद राहिल्याने धनंजय मुंडे यांनी त्याला बाजूला केले होते.

बजरंग सोनावणे यांच्याशी मतभेद

खासदार बजरंग सोनावणे हे विरोधी गटातील नेते आहेत. केज नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या मुलीविरोधात सुग्रीव कराड यांच्या पत्नीने निवडणूक लढवली होती. तसेच त्या निवडूनही आल्या होत्या.

एसआयटीला मदत

सूत्रांच्या माहितीनुसार, सुग्रीव कराडने आरोपींना पकडण्यासाठी एसआयटीला मदत केली होती. तसेच, संतोष देशमुख हत्या प्रकरणात डॉ. संभाजी वायभसे आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यास महत्त्वाची माहिती देऊ, असाही सल्ला सुग्रीव कराडने एसआयटीला दिल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com