
महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या तावडीत आहे. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. याच दरम्यान, कोरटकरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये तो आलिशान रोल्स रॉईस कारसोबत दिसतो आहे. मात्र, ही कार नेमकी कुणाची आहे? याबाबत कोरटकर माहिती देण्यास तयार नव्हता. अखेर, या कारचे गूढ उलगडले आहे.
प्रशांत कोरटकर जी आलिशान रोल्स रॉईस चालवताना दिसतो आहे, ती पिंपरी - चिंचवडमधील बांधकाम व्यवसायिक तुषार कलाटेंकडे असल्याची माहिती समोर आली आहे. ही कार मुळशी तालुक्यातील तुषार कलाटे यांच्या फार्महाऊसवर उभी असल्याचे एका व्हिडीओत स्पष्ट झाले आहे. तसेच, WB-02-AB-123 या क्रमांकाच्या रोल्स रॉईस सोबत तुषार कलाटे यांचे काही फोटोही समोर आले आहेत.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ देखील आहे.या व्हिडिओत प्रशांत कोर्टकर आणि तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येत आहे. मनोहर भोसलेंवर याआधी अघोरी विद्येमार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कोरटकर, कलाटे आणि भोसले यांचा नेमका काय संबंध आहे, याबाबत आता चौकशी होण्याची शक्यता आहे.
तुषार कलाटे याने ही रोल्स रॉईस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली होती का? असाही प्रश्न निर्माण होत आहे. खरंतर, रोल्स रॉईस महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे. या कारचा लीलाव होणार होता. मात्र, काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने ही कार भलत्याच व्यक्तीला विकली होती. त्या व्यक्तीकडून ही कार कोरटकर आली होती. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या रोल्स रॉईसबाबत विचारणा केली. तेव्हा कोरटकरने कारबाबात कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.