Dombivali News: गुढी पाडव्याच्या दिवशी डोंबिवलीतील फडके रोड असणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Chaitra Padwa Shobha Yatra route: नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवलीतील फडके रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पहाटे ४ ते दुपारी २ या काळात हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
Dombivali
DombivaliSaam
Published On

नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवलीतील फडके रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पहाटे ४ ते दुपारी २ या काळात हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. शोभा यात्रेमध्ये वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर फडके रोड वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. याची माहिती डोंबिवलीतील वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी दिली आहे.

फडके रस्ता वाहतूक बंदची अधिसूचना ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढली आहे. इतर वाहने वगळता फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने, जसे की अग्निशमन वाहने, रूग्णवाहिका, पोलीस वाहनांना फडके रस्त्यावर प्रवेश असणार आहे.

फडके रस्ता शोभा यात्रेनिमित्त १० तास बंद असल्याकारणाने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन डोंबिवली वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांनी दिले आहेत.

Dombivali
Pune News: पुण्यातील महिलेचा निकोबार बेटावर अपघात, मुरलीधर मोहोळ आले मदतीला धावून; महिलेवर उपचार सुरू

स्वागत यात्रेचा मार्ग

डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान, सुभाषचंद्र बोस रस्ता, महात्मा फुले रस्ता, दिनदयाळ रस्ता, डॉ. राजेंद्रप्रसाद रस्ता, कोपर पूल, शिवमंदिर रस्ता, मानपाडा रस्ता आणि फडके रस्ता असा स्वागत यात्रेचा मार्ग आहे.

Dombivali
Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट, आणखी एक 'कराड'चं नाव, चाटेच्या जबाबातून खुलासा

प्रवेश बंद

या शोभा यात्रेनिमित्त पहाटे ४ ते दुपारी २ वाजेपर्यंत फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, मदन ठाकरे चौक, आप्पा दातार चौक रस्त्यावर वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारड सर्कल) मार्गे डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्याने ब्राह्मण सभेवरून फडके रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. यासह डोंबिवली पश्चिमेकडून कोपर पुलावरून पूर्व भागात जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com