
पुण्यातील महिलेचा अंदमान/ निकोबार बेटावर भीषण अपघात झाला आहे. लोहपात्रे दाम्पत्य अंदमान/ निकोबार बेटावर फिरायला गेले होते. यादरम्यान, महिलेचा भीषण अपघात झाला. डोक्याला जबर मार आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेची अवस्था बिकट झाली होती. बेटावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरळीधर मोहोळ धावून आले आहेत. त्यांनी लोहपात्रे दाम्प्त्याला पुण्यात आणण्याची सोय केली. तसेच महिलेच्या उपचारासाठी मदत केली.
पुण्यातील सिंहगड रोड येथे लोहपात्रे कुटुंब सहपरिवार राहतात. पती, पत्नी आणि मुलगा अंदमान निकोबार/ पोर्ट ब्लेअर येथे फिरायला गेले होते. शोभना मंगेश लोहपात्रे यांचा बेटावर अपघात झाला. त्यांच्या दुचाकीला एक भरधाव वाहनाने धडक दिली. हा भीषण अपघात २६ मार्चला झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघात घडल्यानंततर लोहपात्रे कुटुंबाला अंदमान/ निकोबार बेटावर वैद्यकीय सुविधा मिळाली नाही. याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना मिळताच त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
मुरलीधर मोहोळ यांच्या सुचनेनुसार, एअरफोर्सच्या मदतीने लोहपात्रे कुटुंबाला अंदमान/ पोर्ट ब्लेअर येथे रात्री २ वाजताच्या दरम्यान आणले. सकाळी मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने एक एअर रूग्णवाहिका लोहपात्रे कुटुंबासाठी उपलब्ध करून दिली. तसेच मोहोळ यांनी तेथून हॉस्पिटलपर्यंत पुणे पोलिसांना ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुणे विमानतळावर दाम्पत्य नऊ वाजून ५१ मिनिटांनी दाखल झाले. त्यांना केवळ १३ मिनिटांमध्ये म्हणजे दहा वाजून चार मिनिटांनी पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यासाठी 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात आले. त्यात विमानतळ, येरवडा, शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग वाहतूक शाखेतील पोलिसांच्या मदतीने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. ज्या ठिकाणी वाहतुकीसाठी साधारण ३० ते ४० मिनिटे लागतात. ते अंतर केवळ १३ मिनिटांत पार केले. सध्या शोभनावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.