Vasai railway station saam tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! झोपेत असताना पतीने पत्नीला ट्रेनखाली ढकलले, नेमकं काय घडलं?

वसई येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

चेतन इंगळे

वसई : येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. वसई रेल्वे स्थानकात (Vasai Railway Station) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्लॅटफॉर्म वर झोपलेल्या पत्नीला तिच्या पतीने ट्रेन खाली ढकलून दोन मुलांसोबत पलायन केले आहे. या गंभीर घटनेमुळं महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (cctv) या घटनेचा संपूर्ण थरार कैद झाला आहे. आज सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस (Police) आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चार वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकात पत्नी झोपेत असताना पतीने तिला अचानक जागे केले. त्याचवेळी भरधाव वेगाने धावणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनखाली पतीने पत्नीला ढकलून दिले. त्यानंतर दोन्ही मुलांसोबत सदर इसमाने पलायन केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या क्रूर घटनेबाबत सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT