टीम इंडियासाठी 'शुभ'संकेत! शुभमन गिलने ठोकलं पहिलं शतक, सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला

भारतीय क्रिकेट संघात तीन वर्षांपूर्वी पदार्पण करणारा युवा खेळाडू शुभमन गिल झिम्बाव्बे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात चमकला.
Shubman Gill first century against Zimbabwe
Shubman Gill first century against Zimbabwe saam tv
Published On

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात तीन वर्षांपूर्वी पदार्पण करणारा युवा खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) झिम्बाव्बे विरुद्धच्या आजच्या एकदिवसीय सामन्यात चमकला. डावखुरा फलंदाज शुभमन गिलने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (international cricket) पहिलं शतक ठोकून क्रिकेटप्रेमींची वाहवा मिळवली आहे. गिलने शतकच नाही केले तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रमही मोडला आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात शेवटचा तिसरा सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये होत आहे. तीन एकदिवसीय मालिकेत शुभमन गिलने शेवटच्या सामन्यात शतकी खेळी केली. भारताच्या या युवा फलंदाजाने १३० धावांची आक्रमक खेळी साकारली.

Shubman Gill first century against Zimbabwe
Kiran Navgire : इंग्लंड दाै-यासाठी लेडी धाेनीचा भारतीय संघात समावेश; महाराष्ट्रात चैतन्य

सचिन तेंडुलकरने १९९८ साली केलेला विक्रम शुभमन गिलने मोडला आहे. सचिनने २४ वर्षांपूर्वी बुलावायामध्ये झिम्बाब्वेच्या विरुद्ध नाबाद १२७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये अंबाती रायडूने १२४ धावा केल्या होत्या. परंतु,आजच्या सामन्यात चमकदार कामगिरी करत शुभमनने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. गिलने २०१९ मध्ये वनडे क्रिकेटमधूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली. विशेष म्हणजे या फॉर्मेटमध्ये त्याने सर्वात जास्त सामने आणि सर्वाधिक धावा गेल्या महिनाभरात केल्या आहेत.

Shubman Gill first century against Zimbabwe
IND vs ZIM 3rd ODI: दीपक चहर शेवटचा सामना खेळणार की नाही? नवी अपडेट आली समोर

गिलने यापूर्वी वेस्टइंडिज दौऱ्यावर असताना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९८ धावा कुटल्या होत्या. त्यावेळी सामना सुरु असताना पावसाने खोडा घातल्यानं गिलला त्याचे शतक पूर्ण करता आले नाही. गिलने वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक २०५ धावा केल्या होत्या. तसेच प्लेयर ऑफ द सीरिजनेही गिलला सन्मानित करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा गिलने कमाल केली आहे. या मालिकेत तीन सामन्यांमध्ये १२२.५० च्या सरासरीनं आणि १२०.६८ च्या स्ट्राईक रेटने सर्वात जास्त २४५ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि अर्धशतकाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com