Husband-Wife Clash  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : माझ्यासोबत धोका झालाय, माझा नवरा.., लग्नाच्या 2 वर्षानंतर महिलेचा गंभीर आरोप

एका महिलेने आपल्या पतीवर असे काही आरोप केले आहेत. जे ऐकून कुटुंबीयांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Husband-Wife Clash : नवरा-बायकोमध्ये होणारा वाद काही नवीन नाही. किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडणे होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काही वेळा ते विकोपाला जातात. त्यावरून दोघे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. असाच काहीसा प्रकार मुंबईतून समोर आला आहे. येथील एका महिलेने आपल्या पतीवर असे काही आरोप केले आहेत. जे ऐकून कुटुंबीयांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. (Latest Marathi News)

कोल्हापूर (Kolhapur) येथील एका तरुणीचे २०२१ मध्ये घाटकोपर (Ghatkopar) येथील एका तरुणासोबत लग्न झाले होते. मुलगी घरातील लाडकी असल्याने तिच्या घरच्यांनी तिचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात केले होते. पण लग्नाचा आनंद फार काळ टिकला नाही. आता महिलेचा आरोप आहे की तिचा नवरा दररोज रात्री एखाद्या महिलेप्रमाणे कपडे घालतो आणि मेकअप करतो.

महिलेचा आरोप आहे की, एका रात्री ती पतीसोबत झोपली होती. त्यावेळी तिच्या पतीने पुरूषांसारखेच कपडे घातले होते. मात्र, रात्री जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिच्या नवऱ्याने महिलांसारखा मेकअप केला होता. तिने लग्नात (Wedding) जे कपडे घातले होते तेच कपडे नवरा घालून झोपला होता.

इतकंच नाही तर त्याने हातात बांगड्या घालून महिलांसारखा मेकअप देखील केला होता. नवऱ्याला अशा स्थितीत बघून तिला मोठा धक्काच बसला. दुसऱ्या दिवशी तिने याबाबत सासू-सासऱ्यांना सांगितलं. यावर सासूने नवऱ्याला समज देण्याऐवजी उलट तिलाच दमदाटी केली. माझ्या मुलाची ही लहानपणाची सवय आहे, असं सासूने सांगितल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

या घटनेनंतर तिने कोल्हापुरातील तिच्या पालकांकडे केली. ही गोष्ट तिचा पती आणि सासूला समजताच, त्यांनी तिचा मानसिक छळ सुरू केला. महिलेचा आरोप आहे की, तिच्या सासू आणि नवऱ्याने या गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी ती गरोदर असल्याचा बनाव केला. त्यानंतर तिच्या निष्काळजीपणामुळे तिचा गर्भपात झाला, असं महिलेच्या माहेरकडील मंडळींना सांगितलं.

महिलेचे म्हणणे आहे की, मारहाणीनंतर काही दिवसांनी ती कोल्हापुरात तिच्या घरी आली. याबाबत तिने पोलिसांत देखील तक्रार केली. मात्र, सासरची मंडळी श्रीमंत असल्याने त्यांनी पोलिसांना पैसे देऊन हे प्रकरण मिटवलं. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, मुलीने केलेले आरोप ऐकून तिच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.

महिलेच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीवर अत्याचार झाला असून सासरच्या मंडळींनी खोटं सांगून लग्न केलं. त्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आम्ही आमच्या मुलीचे लग्न खूप अपेक्षा ठेवून केले होते. आम्ही त्या मुलालाही भेटलो होतो, पण त्यावेळी काहीही संशयास्पद वाटले नाही. दुसरीकडे महिलेच्या सासरच्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT