Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धक्कादायक! पत्नीला खारमध्ये फिरायला नेलं, वाद होताच पतीनं केलं भयानक कृत्य

Husband Attacked His Wife In Khar: पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Priya More

संजय गडदे, मुंबई

Mumbai News: मुंबईच्या (Mumbai) खारमध्ये पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खार पश्चिम परिसरात ही घटना घडली. चाकू हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने (husband attacked his wife) घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच खार पोलिसांनी (Khar Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणाचा तपास खार पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या धारावी शाहूनगर परिसरात राहणाऱ्या या पती-पत्नींमध्ये वाद असून त्यांचे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात सुरू आहे. मात्र रविवारी रात्री हे दोघे खार परिसरात फिरण्यासाठी गेले होते. खारच्या 14 वा रोड परिसरात दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी पतीने त्याच्याजवळ असलेल्या धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार केले. रविवारी रात्री ही घटना घडली.

चाकू हल्ल्यामध्ये महिला रक्तबंबाळ झाली आणि रस्त्यावर पडली. त्यानंतर आरोपी पतीने पत्नीला तिथेच टाकून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी खार पोलिसांना दिली. त्यानंतर खार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेत जखमी महिलेला घेऊन मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील महापालिकेच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

पत्नीवर हल्ला करून पळून जाणाऱ्या महिलेच्या पतीविरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही आणि आरोपीचे कॉल डिटेल्स, जखमी महिलेकडून आरोपी पतीविषयीची काही माहिती गोळा करून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे खार परिसरात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Poha Recipe : अवघ्या ५ मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, आंबट-गोड 'दही पोहे' एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Smartphone Features: तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेली 'ही' गुप्त फीचर्स माहिती आहेत का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT