Acid attack on woman saam tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! पती आणि प्रियकराने काढला काटा, विवाहित तरुणीवर अॅसिड हल्ला, नेमकं काय घडलं?

नालासोपारा परिसरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे.

चेतन इंगळे

मुंबई : नालासोपारा परिसरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ माजली आहे. एका विवाहीत तरुणीवर तिच्या पतीने आणि प्रियकराने अॅसिड हल्ला केला. तरुणीच्या अंगावार अॅसिड फेकल्यानं तिचा चेहरा आणि हात भाजला असून तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पेल्हार पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (Acid attack on woman in nalasopara)

नेमकं काय घडलं?

ही पीडित तरुणी नालासोपारा वाकणपाडा येथील असून घाटकोपर येथे राहणाऱ्या तौफीक नावाच्या व्यक्तीसोबत तिचा विवाह झाला होता. पंरुतु, तौफिक तिला मारहाण करत असल्याने त्या तरुणीनं त्याच्यासोबत असलेलं नातं तोडलं होतं. त्यानंतर ही तरुणी कामरान सोबत लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत होती. पण कामराने लग्नाला नकार दिल्याने तिनं त्याच्यासोबतही नातं तोडलं.

त्यानंतर सदर तरुणी नालासोपाऱ्यातील कमाल या व्यक्तीसोबत राहत होती. परंतु, याबाबत तौफिक आणि कामरानला कळल्यानंतर त्यांनी तिच्यासोबत भांडण केलं. पण त्या तरुणीनं दोघांनाही नापसंती दाखवून कमाल बरोबर राहण्याचं ठरवलं. त्यानंतर रागाच्या भरात दोघांनी कट रचून सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास तरुणीवर अॅसिड हल्ला केला.

त्यानंतर त्या दोघांनी पळ काढला. अॅसिड हल्ल्यात तरुणीसह कमालही जखमी झाला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT