Kolhapur News: कोल्हापुरात दोन आठवड्यांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता; लव्ह जिहादचा संशय, नितेश राणे आक्रमक

मुलीचा शोध घेऊन परत न आणल्यास तांडव करू असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
Kolhapur News
Kolhapur NewsSaam TV
Published On

>> रणजीत माजगावकर

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur News) लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. एक शाळकरी मुलगी गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहे. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तसेच शाळकरी मुलगी जर परत आली नाही तर तांडव करू, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला. तर धर्मांतर बंदीचा कायदाही येत्या अधिवेशनात आणणार असल्याचं सांगितलं. कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं. या आंदोलनात नितेश राणे देखील सहभागी झाले होते.

दरम्यान शाळकरी मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयीताविरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा फोटो पोलिसांना जाहीर केला आहे. अल्ताफ काझी याने अपहरण केले असल्याचे शोधपत्रिकेत नमूद केले आहे. अपहरणकर्ता दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापुरातील अल्पवयीन शाळकरी मुलगी बेपत्ता आहे. या मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा आरोपीवर संशय आहे. मुलीचा पत्ता लागत नसल्याने नितेश राणे यांनी आक्रमक होत कोल्हापूर पोलिसांची खरडपट्टी केली. राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पोलिसांच्या तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली. तर मुलीचा शोध घेऊन परत न आणल्यास तांडव करू असाही इशारा दिला. (Latest Marathi News)

Kolhapur News
कुंकू लाव, मगच तुझ्याशी बोलतो, 'साम'च्या महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

कोल्हापुरातील ही मुलगी 17 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे. दिवाळीपूर्वीच पेपर द्यायला गेलेली मुलगी परतली नसल्याने नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिली. मुस्लीम युवकाने या मुलीला पळवल्याचा संशय आहे. मुस्लीम युवकही या दरम्यान बेपत्ता असल्याने हा संशय बळावला आहे. लव्ह जिहादसाठीच मुलीला पळवल्याचा आरोप होत आहे.

Kolhapur News
उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर लवकरच भेटण्याची शक्यता, राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र दिसणार?

मुलीचा आणि युवकाचा शोध लागत नसल्याने पोलिसांविरोधात रोष आहे. पोलिसांडून तपासाला गती येत नसल्याने आज आक्रमक झालेल्या हिंदू संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. या सगळ्या प्रकरणानंतर आता राज्यात धर्मांतर बंदीच्या कायद्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com