Vaishavi Hagavne Saam
मुंबई/पुणे

Vaishnavi hagavne: 'वैष्णवीचा नवरा मला मारायचा, म्हणून माझे हात..', वैष्णवीच्या मोठ्या जाऊ बाईंकडून गौप्यस्फोट

Pune Womans Death Sister-in-Law Accuses Family: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले असतानाच, तिच्या मोठ्या जाऊने प्रसारमाध्यमांसमोर अनेक खुलासे केले आहेत.

Bhagyashree Kamble

पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरूण विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीच्या घरच्यांनी भरभक्कम हुंडा देऊनही तिचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरूच होता. याच त्रासाला कंटाळून तिने स्वत:चे आयुष्य संपवलं. ही बाब उघडकीस येताच वैष्णवीच्या जाऊ मयुरी हगवणे हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच अनेक गौप्यस्फोट देखील केले आहेत.

वैष्णवीचा मृत्यू सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळामुळे झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशातच वैष्णवीच्या मोठ्या जाऊ मयुरी हगवणे हिने देखील प्रसारमाध्यमांसमोर अनेक खुलासे केले आहेत. मयुरीला सासरच्या मंडळींकडून छळ सुरू होता, असा आरोप तिने केला आहे. 'मलाही सासरच्या मंडळींकडून कायम छळ आणि त्रास सुरू होताच. जानेवारी महिन्यात हगवणे कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती', असा आरोप मयुरीने केला आहे.

वैष्णवीला सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाबाबत मयुरी म्हणाली, 'जाऊ असूनही आम्हा दोघींना कधी एकत्र बोलू दिलं नाही. सासू, नणंद आणि पतीने वैष्णवीशी कधी बोलू दिलं नाही. वैष्णवीला मारहाण व्हायची, याची कल्पना होती. पण वैष्णवीचा नवरा येऊन मला मारायचा म्हणून मी काहीच करू शकले नाही', असं मयुरी म्हणाली.

'हुंड्यासाठी कायम छळ सुरूच होता. वैष्णवीचा नवरा तिच्यावर कायम संशय घ्यायचा. ही लोक खूप क्रुर वृत्तीची आहेत. ते माझ्या पतीला मारू शकतात, तर सुनेला कसं सोडू शकतात', असं मयुरी म्हणाली. हगवणे कुटुंब त्यांच्या मोठ्या मुलालाही मारहाण करत असल्याची माहिती मयुरीने दिली.

'लग्न झाल्यानंतर माझ्या नवऱ्याला कायम दुय्यम वागणूक दिली आहे. ही पोरगी खूप आगाऊ आहे. तिला सोडून दे, तुझं दुसरं लग्न लावून देऊ, श्रीमंत घराण्यातील मुलगी तुला सहज मिळून जाईल, असं माझ्या नवऱ्याला सांगायचे. पण माझ्या नवऱ्याने माझी कायम साथ दिली आहे. यावर माझे मिस्टर, मी तुम्हाला सोडून देईन, पण पत्नीला सोडणार नाही, असे म्हणायचे. याच कारणामुळे हगवणे कुटूंब त्यांच्या मोठ्या मुलाला खूप त्रास द्यायचे. पती माझ्यासमोर ढसाढसा रडले, स्वत:च्या मुलाला कधी समजू शकले नाही, तुला काय समजून घेतील, असं म्हणायाचे'. असा खुलासा मयुरीने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT