माणुसकी जिवंत आहे: कुत्र्याच्या 3 पिल्लांचा फायर ब्रिगेडने वाचवला जीव प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

माणुसकी जिवंत आहे: कुत्र्याच्या 3 पिल्लांचा फायर ब्रिगेडने वाचवला जीव

सोसायटीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या 3 पिल्लांचा जीव कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवला आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : सोसायटीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये पडलेल्या कुत्र्याच्या 3 पिल्लांचा जीव कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवला आहे. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली सोसायटीत आज सकाळी हा प्रकार घडला. (Humanity is alive: 3 puppies rescued by fire brigade)

हे देखील पहा -

या सोसायटीच्या ड्रेनेज चेंबर्समध्ये कुत्र्याचे पिल्लू पडल्याची माहिती केडीएमसी फायर ब्रिगेडला सोसायटीतील रहिवाशांनी दिली. त्यानूसार केडीएमसी फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि या पिल्लांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र चेंबरमधील अरुंद असणारी जागा आणि त्यात अडकलेल्या पिल्लाच्या ओरडण्यामुळे फायर ब्रिगेडच्या जवानांचा जीवही कासावीस झाला होता. मात्र कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आणि आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावत अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून या कुत्र्याच्या पिल्लाची सुटका केली.

चेंबरमध्ये अडकलेल्या या पिल्लांना बाहेर काढण्यास आणखी थोडा जरी वेळ लागला असता या इवल्याशा पिल्लांच्या जीवावर बेतले असते अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. या तीनही पिल्लांना ड्रेनेज चेंबरमधून बाहेर काढल्यानंतर उपस्थित नागरिकांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले. तर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या विनायक लोखंडे, राहुल भाकरे, निखिल इशाने, युवराज राठोड आदींच्या टीमने या ही कामगिरी केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT