प्रातिनिधिक फोटो  Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

Pimpri-Chinchwad News: पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये तळवडे येथे फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समजते. तर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Satish Kengar

Pimpri-Chinchwad Fire :

पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर आणखी काही कामगार त्यात फसल्याच बोललं जातंय. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये

काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवल आहे. सरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत.आत्तापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पिंपरी- चिंचवडमधील तळवडे या ठिकाणी आगीमध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना तीनच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहन पोहोचली असून जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. मृत्यू झालेले सर्व कामगार हे केकवरील वरील फायर कँडल बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरु आहेत. (Latest Marathi News)

दहिसरमध्ये गॅस पाइपलाइन फुटली

दरम्यान, दहिसर पूर्व भागातील जरीमरी गार्डनच्या बाहेर रस्त्याच्या कडेला फूटपाथ खोदणाऱ्या जेसीबीमधून भारत गॅसची पाइपलाइन फुटली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तात्काळ गॅस कनेक्शन बंद करून गॅस वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला.

गॅस गळतीमुळे कोणताही धोका होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूंचे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. जरीमरी गार्डनच्या बाहेरील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीसाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या नाल्यातून भारत गॅसची पाइपलाइन गेली आहे. खोदकाम करत असताना गॅस पाइपलाइन फुटल्याने जेसीबी मालक जेसीबीसह पळून गेला. पोलीस, भारत गॅस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी संयुक्तपणे पंचनामा करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT