huge fire broke garage in Pune Narhe area 10 vehicles burnt Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Fire News: पुण्यातील नऱ्हे परिसरात मध्यरात्री भीषण आग; १० वाहने पूर्णत: जळून खाक

Pune Fire News: पुण्यातील नऱ्हे परिसरात असलेल्या अंबामाता मंदिराजवळील परफेक्ट ऑटो गॅरेजला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली.

Satish Daud

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Fire News

पुण्यातील नऱ्हे परिसरात असलेल्या अंबामाता मंदिराजवळील परफेक्ट ऑटो गॅरेजला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र, गॅरेजमध्ये असलेली १० वाहने पूर्णत: जळून खाक झाली आहे. यामध्ये ४ चारचाकी वाहने आणि ६ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण गुलदस्त्यात आहे.

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. २३ नोव्हेंबर रोजी देखील शहरातील वेस्टएंड मॉलमध्ये मोठी आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत मॉलमधील नागरिकांना सुखरुप बाहेर काढलं होतं.

ही घटना ताजी असतानाच नऱ्हे परिसरात असलेल्या परफेक्ट ऑटो गॅरेजला मंगळवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी १० वाहने पूर्णत: जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

गॅसची पाईपलाईन फुटल्याने कोंढव्यात भीषण आग

कोंढवा परिसरात असलेल्या पारगे नगर येथील रस्त्यावर एमएनजीएल गॅसची पाईपलाईन फुटल्याने भीषण आग लागली. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.

आगीवर पाण्याचा मारा सुरू ठेवत अग्निशमन एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांशी नियंत्रण कक्षामार्फत संपर्क साधला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एमएनजीएलच्या मुख्य वाहिनीचा प्रवाह बंद केला. त्यामुळे आग नियंत्रणात आली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT