HSRP Number Plate Saam Tv
मुंबई/पुणे

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढवली; शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

HSRP Number Plate Deadline Increases: HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत नंबरप्लेट बसवू शकतात. जर तुम्ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

Siddhi Hande

HSRP नंबरप्लेट बसवणे अनिवार्य

२०१९ पूर्वी सर्व वाहनांना नंबरप्लेट बसवा

HSRP नंबरप्लेट बसवण्याची मुदत वाढवली

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. २०१९ च्या सर्व वाहनांना आधीच एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. २०१९ आधीच्या सर्व वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची आहे. दरम्यान, आता एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख काय? (HSRP Number Plate Deadline)

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. आता तुमच्याकडे एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी एक महिना उरला आहे. पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील लाखो वाहनधारकांना अजूनही एचएसआरपी नंबर प्लेट बसवायची आहे. पुण्यातील १५ लाख वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

२०१९ पूर्वीच्या वाहनांना HSRP बंधनकारक (HSRP Number Plate Mandatory before 2019 Vehicles)

एचएसआरपी नंबरप्लेट देशातील सर्व वाहनांसाठी सारखी असणार आहे. ही नंबरप्लेट लावणे गरजेचे आहे कारण जर कोणता गुन्हा किंवा अपघात झाला तर वाहनांबाबत लगेच माहिती मिळावी.त्यामुळे आता सर्व वाहनांना एकसारखी नंबरप्लेट बसवावी लागणार आहे.

३१ डिसेंबरनंतर भरावा लागणार दंड

परिवहन विभागाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पुण्यातील अजून ६५ टक्के वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. आता या नंबरप्लेटशिवाय आरटीओमध्ये कोणतेही काम होत नाही. दरम्यान, जर तुम्ही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. वाहनधारकांना १०,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील MIDC मध्ये अग्नितांडव, केमीकल कंपनीत भयंकर आग

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात शॉकिंग एलिमिनेशन; 'या' सदस्यांचा पत्ता कट, चाहते नाराज

Pune Crime : पत्नीने सोन्याचे दागिने मागितले, पतीने भर रस्त्यात केली निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

Jio Recharge 90 Days: Jioचा 90 दिवसांचा स्वस्तात मस्त प्लान; डेटा, कॉलिंगसह 'हे' आहेत जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT