HSC Result 2025 Saam TV
मुंबई/पुणे

HSC Result 2025: मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे आणि कसा चेक कराल रिझल्ट?

HSC Result Date: बारावीच्या निकालाची तारीख समोर आली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजे ५ मे रोजी लागणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

Priya More

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (MSBSHSE) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण बारावीचा निकाल उद्या म्हणजे ५ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने नुकताच ही घोषणा केली. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहयला मिळेल. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.

माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. ५ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली व ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

बारावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर निकालाची तारीख कधीही जाहीर केली जाऊ शकते असे देखील सांगितले जात होते. त्यानुसार आज बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केली.

निकाल कुठे पाहाल -

१. https://results.digilocker.gov.in

२. https://mahahsscboard.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

५. https://results.navneet.com

कसा चेक कराल निकाल?

- विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.

- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.

- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका. त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.

- त्यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.

- हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT